यावेळी आमदार अतुल बेनके, तहसीलदार हनुमंत कोळेकर, सभापती विशाल तांबे, जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, पंचायत समिती सदस्य रंजना काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी उमेश गोडे, प्राथमिक अरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार डॉ. किरण जाधव, डॉ. आरती गीते, सरपंच सुरेखा वेठेकर, उपसरपंच अमोल वंडेकर आदी उपस्थित होते. आमदार अतुल बेनके यांनी फाउंडेशनच्या सदस्यांचे कौतुक करून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
या फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम हाती घेतले जातात. कोरोनाच्या बिकट काळात फाउंडेशनने प्लाझ्मादान मिळवून देण्याचे काम हाती घेतले आहे. या उपक्रमात राघव पोटे, विमलेश गांधी, महेश कुटे, अशोक डेरे, सत्यवान कुटे, राजेश ठुबे, कल्पेश कुटे, डॉ. सचिन शिंदे, सचिन जाधव, जालिंदर चव्हाण, राजेश मोझे, संतोष कुटे आदी तरुणांचा सहभाग आहे. दरम्यान, पशुवैद्यकीय डॉ सोनवणे व ११ मारुती ग्रुप यांच्याकडून रोख २१ हजार मदत देण्यात आली.
१५ पिंपरी पेंढार
पिंपरी पेंढार सोशल युथ फाउंडेशनच्या वतीने सुरू केलेल्या कोविड सेंटरचे उद्घाटन करताना मान्यवर.