नारायणगाव : नोटाबंदीच्या काळात बँकेत रक्कम जमा करणाऱ्या खातेदारांची माहिती यापूर्वी रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया व आयकर विभागाने मागितली होती़ आता केंद्राच्या अखत्यारित असलेल्या सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खातेदारांची माहिती मागविल्याने खातेदारांचे धाबे दणाणले आहेत़ ५० हजारांच्या पुढे ठेव ठेवणाऱ्या किंवा मुदतठेव बंद करणाऱ्या सर्व खातेदारांची माहिती सीबीआयने मागितल्याने याबाबत काय कार्यवाही होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ सीबीआय पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व सहकारी बँकांना पत्र पाठवून खातेदारांची माहिती मागविली आहे़ दि़ ८ नोव्हेंबर २०१६ ते १५ नोव्हेंबर २०१६ दरम्यान ५० हजारांपेक्षा जास्त ठेवी ठेवणाऱ्या, तसेच ठेव ठेवल्यानंतर बंद करून रक्कम काढणाऱ्या, मुदत संपलेल्या तसेच गुप्त खात्यांची माहितीदेखील सीबीआयने मागितली आहे़ ज्या खातेदारांच्या खात्यांवर ५० हजारपेक्षा जास्त रक्कम जमा आहे त्या खातेदारांच्या फॉर्मची प्रत सीबीआयला सादर करावी लागेल.
ठेवींवर राहणार आता सीबीआयचा ‘वॉच’
By admin | Published: January 24, 2017 1:47 AM