पुणे : मुसळधार पावसामुळे शहरात पुरपरिस्थिती निर्माण होत असलेल्या तसेच पाणी साचून परिसराला धोका निर्माण होणाऱ्या १०० ठिकाणी महापालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या आढाव्यात हा निर्णय घेण्यात आला असून, याकरिता महापालिकेच्या आयटी विभागाला तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना केली आहे.
सध्या पुणे शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पुरपरिस्थिती निर्माण होत असलेल्या ४० ठिकाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे़ याव्दारे पाण्याची पातळीवर नियंत्रण ठेऊन, पाण्याची पातळी वाढल्यास महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात येत आहे़ दरम्यान आता पाणी साचणाºया ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी आणखी १०० सीसीटीव्ही खरेदी केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. तसेच महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयांवर बसवलेली पर्जन्यमापक यंत्रणा लागलीच दुरूस्त करून ती कार्यान्वित करण्याबाबतचेही आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------