शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा
2
"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा
3
"मंत्रालय हागणदारी मुक्त करायचंय"; संजय राऊतांचा महायुतीच्या कारभारावर घणाघात
4
Sanju Samson बन गया 'सेंच्युरी' मॅन! षटकार-चौकारांची केली 'बरसात'
5
"मनोज जरांगेंनी वेळीच सरकारला ओळखलं अन्..."; भास्कर जाधवांनी महायुतीला घेरलं
6
IND vs BAN : संजू-सूर्याची जोडी जमली; पॉवर प्लेमध्ये टीम इंडियानं सेट केला नवा रेकॉर्ड
7
त्या २० जागांवर निकाल बदलणार, हरयाणात बाजी पलटणार? काँग्रेसची पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव  
8
"भाजपा हा दहशतवाद्यांचा पक्ष"; मल्लिकार्जून खरगेंचा PM मोदींवर पलटवार
9
Masaba Gupta Satyadeep Misra welcomes Baby Girl: मसाबा गुप्ता-सत्यजीत मिश्राला 'कन्यारत्न'; सोशल मीडियावरून शेअर केली 'गोड बातमी'
10
मनोज जरांगे विधानसभा लढवणार? दसरा मेळाव्यातील 'त्या' विधानाची चर्चा
11
डोक्यावर पदर समोर पिस्तूल आणि तलवार; रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीकडून शस्त्र पूजन
12
"जगाच्या इतिहासात मला नाही वाटत एखादी संघटना..."; राज ठाकरेंची RSS बद्दल खास पोस्ट
13
Ajay Jadeja Net worth, Virat Kohli: एका दिवसात मालामाल... अजय जाडेजाने संपत्तीच्या बाबतीत विराट कोहलीलाही टाकलं मागे!
14
"गरज पडल्यास हत्यारांचा पूर्ण क्षमतेने वापर होणार, शस्त्रपूजा हे त्याचे संकेत’’, राजनाथ सिंह यांचा इशारा
15
Chris Gayle, LLC 2024 Video: ख्रिस गेल शो! मैदानात तुफान कल्ला, गोलंदाजांची केली धुलाई, फॅन्सचा प्रचंड जल्लोष
16
रोमँटिक झाली हसीन जहाँ; कमेंट आली... "आता शमी भाऊ भेटत नसतो जा!"
17
"मला चारही बाजूंनी घेरलंय, मी तुमच्यात असो वा नसो…’’, सनसनाटी दावा करत जरांगे पाटलांचं भावूक आवाहन
18
"सर्व काही गमावले तरीही...", काँग्रेस आमदार विनेश फोगाटची क्रिप्टिक पोस्ट
19
भ्रष्ट अधिकाऱ्यांना पीएम मोदी घरचा रस्ता दाखवणार; कारवाईच्या सूचना दिल्या
20
पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, आमदार सुलभा खोडकेंचं काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन  

सीसीटीव्हीचे सुरक्षाकवच की दिखावा?

By admin | Published: July 08, 2015 2:50 AM

रस्त्यावरच्या वाहतुकीपासून ते इमारतींच्या सुरक्षाव्यवस्थेपर्यंत सध्या सीसीटीव्हींचा बोलबोला असला तरी त्याची प्रत्यक्ष उपयुक्तता किती? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे

पराग पोतदार पुणेरस्त्यावरच्या वाहतुकीपासून ते इमारतींच्या सुरक्षाव्यवस्थेपर्यंत सध्या सीसीटीव्हींचा बोलबोला असला तरी त्याची प्रत्यक्ष उपयुक्तता किती? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सीसीटीव्हीबाबतची तांत्रिक माहिती व गुणवत्तेचा आग्रह नसेल तर सीसीटीव्ही हे सुरक्षाकवच न ठरता तो नुसताच दिखावा ठरण्याचीच शक्यता जास्त आहे. नुकतेच सिंहगड रस्त्यावर झालेल्या वाहन जाळण्याच्या प्रकारात संबंधित आरोपी सीसीटीव्हीत कैद झाली खरा परंतु त्याचे चित्र धूसर असल्याने आरोपी स्पष्ट दिसलाच नाही. अखेर त्याच्या धूसर वर्णनावरून रेखाचित्र बनवून पोलिसांना शोध घ्यावा लागला. असेच प्रकार शहराच्या अनेक भागांमध्ये जेव्हा घटना उघडकीस येतात तेव्हा दिसून येते की कॅमेऱ्यातील चित्रच स्पष्ट नसते. संपूर्णत: सीसीटीव्हीवर अवलंबून राहता येत नाही अथवा रेकॉर्डिंग हवे त्या वेळचे मिळत नाही अगर मिळाले तरी त्याची स्पष्टता चांगली नसते. असे वारंवार दिसून येते. शहरात अनेक ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्डिंगची सुविधा नीट अपडेट न केल्याने, चांगल्या दर्जाचा डीव्हीआर रेकॉर्डर न घेतल्याने वा उत्तम दर्जाचे कॅमेरे न घेतल्याने अनेक ठिकाणी केवळ सीसीटीव्ही बसवण्याचा सोपस्कारच पूर्ण झाल्याचे दिसून येते.