--
वाल्हे : कोरोना अद्याप संपलेला नाही निर्बंध शिथिल झाले असले, तरी निर्बंध पूर्णत: संपलेले नाहीत, याचे भान सार्वजनिक गणेश मंडळांनी राखावे आणि कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करावा, अशा सूचना जेजुरी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाल्हे येथे गणेश उत्सवासंदर्भात पोलीस प्रशासन व गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, हनुमंत पवार, पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे, दौंडजचे पोलीस पाटील दिनेश जाधव, दत्तात्रय पवार, राजेसिंह पवार, पोलीस नाईक गणेश कुतवळ, संदीप मदने, समीर हिरगुडे,प्राध्यापक सतोष नवले, ग्रामपंचायत सदश्य विजय फाळके,मंडळाचे कार्यकर्ते सागर भुजबळ, प्रशांत पवार,रामदास बरकडे,राजकुमार शिंदे,चंद्रकांत गंगावणे, नवनाथ चव्हाण, सैगंध शहा,पांडुरंग भुजबळ, अनमोल भोसले विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महाडिक म्हणाले की, गणेश उत्सव साजरा करीत असताना ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. समाजोपयोगी काम करा. त्याचबरोबर महाडिक यानी या वेळी आलेल्या तरुणांना स्पर्धा परीक्षाविषयक माहिती दिली. ते म्हणाले की, लवकरच राज्यात मेगा पोलीस भरती होत आहे. त्या अनुषंगाने स्पर्धा परीक्षांचे अभ्यासक्रम राबवून हा उत्सव साजरा करा.
--
०२वाल्हे गणेशउत्सव बैठक
वाल्हे येथे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देताना पोलीस निरीक्षक सुनील महाडिक.
020921\02pun_2_02092021_6.jpg
०२वाल्हे गणेशउत्सव बैठकवाल्हे येथे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सुचना देताना पोलिस निरिक्षक सुनील महाडिक