प्रभावी आरोग्यविषयक उपक्रम राबवावे
दौड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस
राहुल धस : शिरूरमध्ये गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची प्रशासनासह बैठक
--
शिरूर : सार्वजानिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा करताना उत्साह ठेवून रक्तदान शिबिरासारखे प्रभावी आरोग्यविषयक उपक्रम राबवावे, असे आवाहन दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केले.
शिरूर पोलीस ठाण्याच्या वतीने सार्वजानिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीतील सभागृहात प्रशासन व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी दौड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार लैला शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, मुख्याधिकारी प्रसाद बोरकर, पोलीस उपनिरीक्षक किरण उंदरे, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, शिरूर नगरपरिषद पाणीपुरवठा समिती सभापती मुजफ्फर कुरेशी, स्वच्छता समितीचे सभापती विठ्ठल पवार,
माजी नगराध्यक्ष नसिमखान, उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण, महिला दक्षता समिती सभापती शोभना पाचंगे, माधवसेनेचे रवींद्र सानप, भाजपचे बाबूराव पाचंगे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, अनिल बांडे, गणेश मंडळाचे शंकर काका परदेशी यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत रवींद्र धनक, नामदेव घावटे, जाकीर खान पठण, महिबुब सय्यद उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करून, कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शांततेत गणेशोत्सव पार पाडण्याचे व सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.
पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी मानले.
--
फोटो क्रमांक : ०७ शिरुर गणेशमंडळ बैठक
फोटो ओळी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देताना उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस.