शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कोंढापुरी (ता. शिरूर) गावांमध्ये आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी पोलीस उपनिरीक्षक शिवराम खाडे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत अध्यक्ष धनंजय गायकवाड, माजी सरपंच स्वप्नील गायकवाड, सरपंच संदीप डोमाळे, उपसरपंच सुजाता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सागर माघाडे, राहुल दिघे, वि. का. सेवा संस्थेचे अध्यक्ष शांताराम गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड, शामराव ठोंबरे, मंडळाचे प्रमुख बापू गायकवाड, स्वप्नील लोखंडे, स्वप्नील गायकवाड, निखिल मुरादे, ऋषिकेश गायकवाड, ग्रामसेवक राजाराम रासकर आदी उपस्थित होते.या वेळी शेडगे यांनी सांगितले की,कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मंडळ प्रमुखांनी जबाबदारी घेऊन २४ तास स्वयंसेवक कार्यरत असावेत तसेच घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये या अनुषंगाने शासनाने व पोलीस स्टेशनने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करून ऑनलाइन पद्धतीने निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा कोरोनाच्या अनुषंगाने विविध स्पर्धा तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबवून साजरा करावा, असे आवाहन हेमंत शेडगे यांनी केले.
या वेळी हेमंत शेडगे यांनी कोंढापुरी ग्रामविकास फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या कामास भेट देऊन समाधान व्यक्त केले. या वेळी ग्रामस्थांच्या वतीने हेमंत शेडगे यांचा सत्कार करण्यात आला. बैठकीचे प्रास्ताविक राहुल दिघे यांनी केले, तर ग्रामसेवक राजाराम रासकर यांनी आभार मानले.
कोंढापुरी येथे हेमंत शेडगे यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
030921\img-20210902-wa0143.jpg
कोंढापुरी येथे हेमंत शेडगे यांनी मार्गदर्शन केले