चैत्र महिनीतील पौर्णिमेच्या तिथीला सूर्योदयावेळी श्री हनुमान जयंती अगदी साधेपणाने साजरी करण्यात आली. या वेळी कीर्तन, भजन आदी कार्यक्रमाला फाटा देण्यात आला. पूजा करून कोरोनाचे संकट घालवावे, अशी प्रार्थना करण्यात आली
श्री हनुमान देवस्थान ट्रस्ट व नसरापूर व्यापारी असोसिएशनने या वेळी विविध कार्यालयांत जाऊन सामाजिक अंतर ठेवत कोरोना योध्द्यांचा सन्मान केला. राजगड पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे यांचेसह सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, भोर तालुक्याचे आरोग्य अधिकारी सूर्यकांत कराळे, डॉ. जयदीप कापशिकर, डॉ. मिलिंद अहिरे, माजी जि. प. सदस्य कुलदीप कोंडे, सर्व आरोग्य कर्मचारी, मंडलाधिकारी कार्यालयात गावकामगार तलाठी जालिंदर बरकडे, बी. के. शिंदे व महसूल कर्मचारी, नसरापूर ग्रामपंचायतीत ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी व ग्रामपंचायत कर्मचारी यांचेकडे जाऊन हनुमान जयंती साजरी करण्यात आली.
--
फोटो क्रमांक : २७ नसरापूर हनुमान जयंती
फोटो ओळी : हनुमान जयंतीनिमित्त नसरापुरात हनुमान देवस्थान ट्रस्ट व नसरापूर व्यापारी असोसिएशनने कोरोना योध्द्यांना आरोग्यदायी सुंठवडा, व्हिडॅमिन्स औषधे देण्यात आली.