शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजुला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
4
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
5
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
6
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
7
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
8
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
9
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
10
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
11
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
12
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
13
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
14
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
15
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
16
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
17
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
18
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
19
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
20
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...

जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात

By admin | Published: January 28, 2017 12:02 AM

शहर व परिसरात प्रजासत्ताकदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तिपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उत्साहात भर पडली.

शिरूर : शहर व परिसरात प्रजासत्ताकदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. देशभक्तिपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे उत्साहात भर पडली. कर्डेलवाडी जि. प. शाळेत रेखाटलेल्या सामाजिक संदेश देणाऱ्या, तसेच महापुरुष व स्वातंत्र्यवीरांच्या रांगोळ्या सर्वांचे आकर्षण ठरल्या. नगर परिषद शाळेत तर महात्मा गांधी, झांशीची राणी, सावित्रीबाई फुले विद्यार्थ्यांच्या रूपात अवतरल्या. तहसील कार्यालयात प्रांताधिकारी डॉ. वनश्री लाभसेटवार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. तहसीलदार राजेंद्र पोळ, पंचायत समितीचे सभापती सिद्धार्थ कदम, नगर परिषद सभागृहनेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा सुवर्णा लोळगे, नवनिर्वाचित नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांच्यासह शहर व तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर या वेळी उपस्थित होते. नगर परिषदेत नगराध्यक्षा लोळगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्व नगरसेवक, नगरसेविका, शिक्षण मंडळ सदस्य या वेळी उपस्थित होते. नगर परिषद शाळा क्र .१ येथे सभागृहनेते धारिवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. शिक्षण मंडळ कार्यालयात सभापती तुकाराम खोले, शाळा क्र. ५ व ७ मध्ये नगरसेविका सुनीता कालेवार, शाळा क्र. ३ मध्ये शिक्षण मंडळ सदस्य नीलेश खाबिया यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या शाळेत मुख्याध्यापक दत्तात्रय सकट, सहशिक्षिका बेबीनंदा सकट यांच्यासह विद्यार्थ्यांनी महापुरुष, स्वातंत्र्यवीर, तसेच सामाजिक संदेश देणारी सुंदर अशी रांगोळी रेखाटली. ही रांगोळी ग्रामस्थ व पालकांचे आकर्षण ठरली. रघुनाथ कर्डिले, राजेंद्र दसगुडे व राजाराम फरगडे यांनी शाळेस विविध साहित्य भेट दिले.(वार्ताहर)