या वेळी शिक्षणाचे महत्त्व आणि त्याआधारे जीवनात बदल करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक दिन साजरा करण्यामागे डॉ. राधाकृष्णन यांचा शिक्षण आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या दृष्टिकोनाचा सन्मान म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण असतो. विद्यार्थी या दिवशी त्यांच्या जीवनातील शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करतात, अशी भावना एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केली.
दरम्यान, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट तर्फे शिक्षक दिनानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी एमआयटी मिटकॉमच्या संचालिका प्रा. डॉ. सुनीता मंगेश कराड, डॉ. अजीम शेख, डॉ. सुरेश पठारे, डॉ. छब्बी सिन्हा यांच्यासह या विभागाचे अन्य शिक्षक उपस्थित होते. या वेळी गायन, नृत्य आणि इतर विविध कार्यक्रम सादर करण्यात आले.