टेकडीप्रेमींनी यंदा वेगळ्या प्रकारे हा साजरा करणार असल्याचे ठरवले होते. त्यानूसार रविवारी सकाळी वेताळ टेकडीवर एका ठिकाणी सर्वजण जमले आणि तिथे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या उपक्रमात डेक्कन जिमखाना परिसर समितीच्या सुषमा दाते, वैदेशी रानडे, अवंती गाडगीळ, प्रिया भिडे, नीलिमा रानडे, ५१ ए ग्रुपचे ॲड. हिमांशू कुलकर्णी, ॲड. अनय पेठे आदी सहभागी झाले होते.
लॅा कॅालेज रस्त्यावरील टेकडीवर पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू आहे. तिथे स्वच्छता झाली. स्वच्छता करताना ग्लोव्हज व इतर साहित्य देण्यात आले होते.
——————
पुणे शहरातील टेकड्या या वरदानच आहेत. त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला आम्ही वेताळ टेकडीवर स्वच्छता करून प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा उपक्रम राबविला. त्यामुळे हा दिवस आम्ही एक चांगले काम करण्यासाठी खर्ची घातला आहे. त्यातून आम्हाला खूप समाधान मिळाले. आपल्याकडील नैसर्गिक संपत्ती आपणच सांभाळली पाहिजे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली पाहिजे.
- अवंती गाडगीळ, सदस्य, डेक्कन जिमखाना परिसर समिती
—————————-