. बी. एड. प्रथम व द्वितीय वर्षातील छात्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून मायक्रोसॉफ्ट टीमच्या माध्यमातून ऑनलाइन जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये किरण पैठणकर, श्रद्धा पवार, स्नेहल काकडे, विशाल पारधी, कल्याणी सोनवणे या विद्यार्थ्यांनी विचार व्यक्त केले. तसेच जागतिक महिला दिनानिमीत्त घेण्यात आलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा मध्ये १५७ जणांनी सहभाग घेतला. सर्व सहभागींना डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमास प्राचार्य डॉ. वसुदेव व्ही. राऊत व डॉ. स्नेहल एस. वायकोस, प्रा. रामदास कदम यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. निलेश बटवाल यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन योगिता क्षिरसागर व दिपाली शिंदे यांनी केले. व आभार प्रदर्शन महेश आवारी यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव वैभव तांबे यांनी प्रोत्साहन दिले.
तांबे महाविद्यालयात विविध उपक्रमाद्वारे महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:12 AM