आगामी गणेशोत्सवातील कायदा आणि सुव्यवस्था यासंदर्भात मधुबन मंगल कार्यालय कवडीपाट येथे लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या संयुक्त बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे सुभाष काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, दादाराजे पवार, श्रीशैल चिवडशेट्टी, दिगंबर बिडवे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, अमृता काटे, जयंत हंचाटे, भागवत शेंडगे, हंबीरे, सदाशिव निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष कांचन, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, अनिल टिळेकर, हेमलता बडेकर, तंटामुक्ती समितीचे माजी जिल्हाध्यक्ष रघुनाथ चौधरी, सरपंच राजाराम काळभोर (लोणी काळभोर), संतोष हरिभाऊ कांचन (उरुळी कांचन), विठ्ठल शितोळे (कोरेगावमूळ), सोनाली जवळकर (आळंदी म्हातोबाची), कदमवाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर, सोरतापवाडीचे उपसरपंच नीलेश खटाटे, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, विविध गावचे पोलीस पाटील व सार्वजनिक मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.
कार्यक्रमांचे सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी केले. उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांनी मानले.
--
चौकट
नव्या मंडळांना परवानगी नाही
यावर्षी नवीन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी दिली जाणार नाही. जुन्या मंडळांनी परवानगी घेऊनच गणेशोत्सव साजरा करावा गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणूका काढू नयेत, बाप्पाची घरगुती मूर्ती दोन फूट व मंडळांची मूर्ती चार फुटच असावी, आरती, पूजा, कार्यक्रम करताना गर्दी करू नये, शक्यतो मंडळांनी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी, बाप्पाचा प्रसाद बंद पाकिटातून द्यावा, गणेश मूर्तींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही बसवावेत व रात्री सुरक्षेसाठी मंडपात कार्यकर्ते ठेवावे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, गरजूंना मदत यासारखे उपक्रम राबवावेत, आपले मंडळ किंवा घर गणेशोत्सवातील गर्दीमुळे कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ नये, याची दक्षता सर्वांनी घ्यावी.