निमोणे - शिरसगावकाटा (ता. शिरूर) येथील आत्महत्याग्रस्त चव्हाण शेतकरी कुटुंबासमवेत शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठठल पवार यांनी चटणी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी केली.शिरसगांवकाटा (ता. शिरूर) येथील युवा शेतकरी विकास मारूती चव्हाण यांनी मार्च २०१४ साली आत्महत्या केली. त्यांच्या मागे वडिल मारूती, आई राजूबाई, पत्नी सुप्रिया, जगदीश व संचिता ही अल्पवयीन मुले आजही त्यांच्या स्मृतीत दिवस कंठत आहेत.अशी महाराष्ट्रात अनेक कुटुंबे आत्महत्याग्रस्त असुन घरातील कर्त्या पुरुषाच्या जाण्याने आयुष्यात कधीही न भरुन निघणाऱ्या पोकळीत ही कुटुंबे दिवस कंठित आहेत. अशी कुटुंबे कोणताही सण साधेपणानेच करतात.अशा कुटुंबास एक जगण्याची उमेद देण्यासाठी, आम्ही सर्व शेतकरी कार्यकर्ते अशा कुटुंबांच्या सोबत असुन असे टोकाचे पाऊल कोणीही उचलू नये, या उद्देशाने शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या वतीने अशी साधी दिवाळी साजरी करण्यात आली.याशिवाय बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्यांतील विविध गावांतील वाडया- वस्त्यांवरील शेतकºयांच्या घरी जाऊन अशीच चटणी भाकरी खावून त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी केली.शिरसगांवकाटा ( ता. शिरूर ) येथील चव्हाण कुटुंबांच्या भेटी प्रसंगी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, निमोणे गांवचे उपसरपंच प्रविण दोरगे, जिल्हा कार्याध्यक्ष भरत काळे, उपाध्यक्ष रोहिदास काळे, हवेली तालुकाध्यक्ष हनुमत, गव्हाण सुरेश काळे, बाळासाहेब काळे, केरभाऊ दुर्गे, प्रकाश दुर्गे आदी शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकºयांसाठी सनदशीर लढा देणारशेतीमालास योग्य हमीभाव, संपुर्ण कर्जमाफी व विजबील माफी, समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी होईपर्यंत आपला शेतकºयांसाठी, सनदशीर मागार्ने लढा चालू राहील.-विठ्ठलराव पवार, प्रदेशाध्यक्ष- शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनाशेतकºयांनी आत्मघाताचा मार्ग स्विकारू नये. पाठीमागे परिवाराची फार ससेहोलपट होते. आपली पत्नी, मुले, आई वडिल यांचा विचार करावा. कितीही कर्ज झाले तरीही हिंमत न हरता युवा शेतकºयांनी जिद्द व चिकाटी ठेवली पाहीजे.-सुप्रिया चव्हाण, आत्महत्या केलेले विकास चव्हाण यांच्या पत्नी
चटणी-भाकरी खाऊन दिवाळी साजरी, शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 12:31 AM