या वेळी माजी उपमहापौर शंकरराव निम्हण, राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त रवींद्र घाटे, बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे, संजय बालवडकर, यशस्वी हॉटेल उद्योजक रामदास मुरकुटे, संस्थेचे शाखाध्यक्ष राजेंद्र मुरकुटे, शंकरराव सायकर, उपाध्यक्षा अलका सिरसगे, संचालक राजेश विधाते, वसंत माळी, अशोक रानवडे, संजय बालवडकर, अमर लोंढे, गणेश तापकीर, हितेश तापकीर, डॉ. सागर बालवडकर, प्रशांत बहिरगोंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गंगणे, शाखा व्यवस्थापिका सीमा डोके उपस्थित होते.
कोट
पतसंस्थेच्या यशामध्ये संस्थेच्या स्टाफचा फार मोठा वाटा आहे. संस्थेचे संचालक मंडळ जबाबदारीनं आपली कामं निभावतात म्हणून संस्था मोठी होत आहे. संस्थेने या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देखील एक कोटी ९० लाखाचा नफा कमावला ते योग्य नियोजनबद्ध काम केल्यामुळे संस्थेच्या स्टाफने स्वतः ठेवी ठेवल्यामुळे एक वेगळी विश्वासार्हता संस्थेबाबत निर्माण झाली आहे.
- ज्ञानेश्वर तापकीर, संस्थापक अध्यक्ष