शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

अर्थव्यवस्थेला चालना आणि रोजगार देणारा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 5:53 AM

आनंद सराफ सार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. वर्धिष्णू वृत्ती आणि परिवर्तनशीलता या दोन गुणांमुळे काळाच्या कसोटीवर टिकून ...

आनंद सराफसार्वजनिक गणेशोत्सवाला १२७ वर्षांची परंपरा लाभली आहे. वर्धिष्णू वृत्ती आणि परिवर्तनशीलता या दोन गुणांमुळे काळाच्या कसोटीवर टिकून गणेशोत्सव वर्षानुवर्षे वाढत चालला आहे. हा उत्सव समाजाची गरज आहे. कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा, कलाकारांचे व्यासपीठ, समाजोपयोगी अर्थकारण, समरसतेचे अंगण आणि तनामनाला उर्जा देणारा हा उत्सव आहे. गणेशोत्सवाला वेगळ्या उंचीवर नेणारी ही गुणवैशिष्ट्ये आजतागायत टिकून आहेत.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीमध्ये अर्थशक्ती शेतीमध्ये बंदिस्त असताना अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि रोजगार निर्माण करणारा गणेशोत्सव हा एक महत्त्वाचा समाजमान्य उत्सव आहे. हा फक्त एका देवाधर्माचा उत्सव न राहता संपूर्ण देशाचा एवढेच नव्हे, तर आज जगभरातील १२२ छोट्या-मोठ्या देशांमध्ये हा उत्सव पोहोचला आहे. परदेशामध्येही हा उत्सव धुमधडाक्यात साजरा होतो आहे यावरून या उत्सवाचे लोकांच्या मनातील स्थान अधोरेखित होते. काळाच्या कसोटीवर टिकून राहाणे, तो वाढणे हे गुणविशेष या महोत्सवात असल्याने त्याच्यातले दूषित प्रवाह आपसूक बाजूला होतात. गणेशोत्सवाची जी गुणवैशिष्ट्ये आहेत, ती इतर कुठल्याही उत्सवात पाहायला मिळत नाहीत. उत्सवाचे एकमेवाद्वितीय असे हे उदाहरण आहे. उत्सवाने कार्यकर्त्यांमध्ये एकप्रकारचा उत्साह संचारतो. उत्सवातून सामाजिक अभिसरण होतं असल्याने समाजातील प्रत्येक घटकाला गणेशोत्सव आपला वाटतो. आजमितीला गणेशोत्सव हा विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित न राहता, धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करून समाजाला एकसंघ ठेवण्यात मोलाची मदत करणारा असा उत्सव झाला आहे. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य चळवळ म्हणून हा उत्सव सुरू केला असला, तरी बदलत्या काळातसुद्धा आपापले स्वरूप बदलून वैशिष्ट्य कायम ठेवत आपल्यावरच उपकार केले आहेत. गणेशोत्सव अधिकाधिक व्यापक होत जाईल, यात शंकाच नाही.लेखक गणेशोत्सव अभ्यासक, आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत (पुणे )

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेश महोत्सवGanpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019