काटेवाडी : परिसरातील श्री क्षेत्र कन्हेरी देवस्थान येथे दीपावलीनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपावली पाडव्याचे औचित्य साधून मारुती मंदिर परिसरात सर्वदूर हजारो पणत्या दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला.लक्ष्मणमहाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक बाळासाहेब शिंदे यांनी दीपोत्सव उत्सवाचे आयोजन केले होते. या वेळी मंदिर संस्था विश्वस्त प्रशांत काटे यांच्या हस्ते दीपोत्सव व पूजा करण्यात आली. मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता. दीपावलीनिमित्त मंदिरात काकड आरतीसह धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. दीपावली पाडव्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ढेकलवाडी येथेही मारुती मंदिरात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच शिवाजी लकडे यांच्या हस्ते मंदिरात पणती दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंदिर परिसर दिव्यांची रोषणाईने उजळून निघाला होता.
श्री क्षेत्र कन्हेरी देवस्थानमध्ये दीपोत्सव साजरा
By admin | Published: November 15, 2015 12:37 AM