चैत्र शुद्ध नवमीनिमित्त दर वर्षी धामणीच्या पुरातन राममंदिरामध्ये रामनवमीचा मोठा उत्सव असतो. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षाप्रमाणे यंदाही रामजन्मोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला .पहाटे देवस्थानाचे पुजारी मधुकाका क्षीरसागर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची आरती करण्यात आली. कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिर भाविकाच्या दर्शनासाठी बंद करण्यात आलेले होते. दुपारी बारा वाजता मुकुंद क्षीरसागर यांनी श्रीरामाची पंचधातूची देखणी मूर्ती लाकडी पाळण्यात ठेवल्यानंतर महिला भाविकांनी "राम जन्मला गं सखे राम जन्मला " हा रामजन्माचा पाळणा म्हणण्यात येऊन यंदाचा रामजन्माचा सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. कोरोनामुळे भाविकांनी व ग्रामस्थानी मंदिरात येण्याचे टाळले. यावेळी दिलीप आळेकर,मच्छिंद्र वाघ,प्रभाकर भगत, सुनिल सासवडे अजित बोर्ऱ्हाडे उपस्थित होते.
धामणीमध्ये रामजन्मोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:12 AM