शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

सिमेंट कंपनीच्या करारनाम्यावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 2:30 AM

सरपंचविरुध्द ग्रामपंचायत सदस्य; ग्रामस्थात संताप, टोल नाका बंद करण्याची मागणी

पाटस : पाटस ( ता.दौंड ) येथील सिमेंट कंपनीच्या ऊभारणीसाठी ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच शेतीसाठी सदरची सिमेंट कंपनी धोकादायक असल्याने या सिमेट कंपनीची ऊभारणी करु नये असा ठराव ग्रामसभेत झाला. सरपंच विरुध्द १५ ग्रामपंचायत सदस्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्य संभाजी चव्हाण म्हणाले की सरपंचांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही परस्पर सिमेंट कंपनी बरोबर करार केला. तेव्हा आम्ही १५ सदस्य सरपंचावर फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. यावर सरपंच वैजयंता म्हस्के म्हणाल्या की गावाच्या विकासासाठी कंपनी बरोबर करार केला. यावेळी ग्रामस्थ जयंत पाटील म्हणाले की सिमेंट कंपनी झाली तर शेतीचे नुकसान होईल आरोग्याचे प्रश्न निर्माण होईल तेव्हा झालेला करार रद्द करा आन्यथा पुढची पीढी माफ करणार नाही. नामदेवराव शितोळे म्हणाले की शेतकऱ्याचे नुकसान होईल आगोदरच शेतकरी आडचणीत आहे. संभाजी देशमुख म्हणाले की, सिमेंट कंपनी बरोबर करार कोणी केला कसा केला हे वाचून दाखवा संतोष शितकल यांनी कंपनीला मुरुम टाकण्याचा मुद्दा ऊपस्थित केला तेव्हा ग्रामसभेत गदारोळ झाला यावेळी तणावपूर्ण वातावरण झाले होते. शंकर पवार म्हणाले सिमेंट कंपनीला ग्रामपंचायतीने विरोध करा ग्रामपंचायतीच्या मागे ग्रामस्थ ठामपणे ऊभे राहतील .माजी सरपंच योगेंद्र शितोळे म्हणाले की गेल्या ग्रामसभेत सिमेंट कंपनीला परवानगी देऊ नये असे ठरले असतांना परस्पर करार का केला. माजी पंचायत समिती सदस्य सत्वशील शितोळे यांनी स्पष्ट केले की सरपंचांनी केलेला करार हा ग्रामपंचायत सदस्यां समोर ठेऊन तो करार ग्रामसभेत मांडावा. आणि निर्णय घ्यावा असे ठरले या व्यतिरिक्त जर ग्रास्थांचा सिमेंट कंपनीला विरोध असेल तर त्याला माझा पाठींबा राहील.पाटस येथील महामार्गावरील टोल नाक्याचा प्रश्न ग्रामसभेत गाजला टोल नाक्याचे अतिक्रमण काढा गावातील वाहणे टोलमुक्त करा आशी मागणी लक्ष्मण चव्हाण यांनी केली.यावर प्रभारी ग्रामसेवक विलास भापकर यांनी सांगीतले की पाटस टोल नाक्याला याबाबत ग्रामपंचायतीने पञ दिले आहे.यासंदर्भात टोल नाका प्रशासनाने काय ऊत्तर दिले.असे सत्वशील शितोळे यांनी विचारले असता.काहीच ऊत्तर दिले नाही असे ग्रामदैवत ग्रामसेवक भापकर म्हणाले.यावर सत्वशील शितोळे यांनी मागणी केली की येत्या आठ दिवसात टोल नाका प्रशासनाने ऊत्तर दिले नाही तर टोल नाका बंद करु असे पञ ग्रामपंचायतीने टोल नाक्यला द्यावे.ग्रामसभेत सचिन शितोळे यांनी शिक्षणाचा प्रश्न चचेर्ला घेतला गावातील जिल्हा परिषद शाळेला पाणी नाही, स्वच्छतागृहाला प्लस्टिकचे कडी कोयंडे आहे ही गंभीर बाब आहे.अंगणवाड्यांना पाणी पुरवठा होत नाही कनेक्शनचे काम कोणी केले.असा प्रश्न ऊपस्थित झाल्यावर योगेंद्र शितोळे म्हणाले की ज्याने ठेकेदाराला काम करायला सांगितले त्याच्यावर कारवाई करा. अशोक पानसरे म्हणाले की गावात रोगराई वाढली आहे.आरोग्याच्या बाबतीत नियोजन नाही ही गंभीर बाब आहे. म्हसोबा मंदिराच्या जागेच्या प्रश्नावरुन गावातील सर्व अतिक्रमणे काढण्याची मागणी - रेणुका पाचंगे या युवतीने केली.जेष्ठ ग्रामस्थ नारायण भागवत यांनी ज्या ठिकाणी म्हसोबा मंदिर बांधायचे आहे.त्या परिसराची माहीती सांगीतल्यावर म्हसोबा मंदिराचा प्रश्न तूर्त तरी थांबला . शिवाजी ढमाले, जाकीर तांबोळी , दादा भंडलकर नितीन शितोळे सुधीर पानसरे यांच्यासह काही ग्रामस्थांनी समाजहिताचे नागरी प्रश्न ऊपस्थित केले.१५ लाखांचा फलक आणि उत्सुकतापाटसच्या ग्रामसभेत नरम गरम वातावरण होते त्यातच सुरुवाती पासून संतोष शितकल हे हातात फलक घेऊन कधी बसून रहायचे तर कधी ऊभे राहून ग्रासभेच्या आवती भवती फिरत होते दरम्यान हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. गावाचा विकास नाही झाला तरी चालेल आम्हाला १५ लाख मिळाले पाहीजे, असे या फलकावर नमूद केले होते.एकंदरीत ग्रामसभेच्या गरमा गरम चर्चेत माञ १५ लाखाचा फलक ग्रामस्थांसाठी ऊत्सुकतेचा विषय ठरला .करार ग्रामसभेपुढे मांडायचा हे बरोबर आहे परंतू त्यानंतर ग्रामसभा आज होत आहे. एकंदरीतच परिस्थितीचे गांभीर्य पाहता ग्रामस्थांनी सिमेंट कंपनी ऊभारणीला विरोध केला असून सिमेंट कंपनी सुरु करु नका असा ठराव ग्रामसभेत झाला.- वैजयंता म्हस्के, सरपंच

टॅग्स :Puneपुणे