कोविड-१९ या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे आदेश जिल्ह्यामध्ये लागू असतानाही तांदळी येथील स्मशानभूमीत तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल एक लाख ४४ हजार दहा रुपयांचा ऐवज जप्त केला. मात्र, अड्डा चालविणारा प्रमुख आरोपी पळून गेला.
गोपीनाथ बबन गायकवाड, प्रकाश विलास डोईफोडे, नूरमुहम्मद जिम्मुभाई सय्यद (सर्व रा. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), सुभाष एकनाथ खोरे, बाबूलाल याकूब शेख, शामल राजाराम गोवर्धन, नीलेश हरिश्चंद्र बल्लाळ, गणेश दत्तू रासकर, राजू गुलाब गायकवाड, गणेश गायकवाड (रा. सर्व रा. तांदळी, ता. शिरूर ) असी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार : त्यांना बातमी मिळाली होती की, तांदळी गावामध्ये घोड नदीच्या पात्रालगत जुन्या स्मशानभूमीच्याजवळ तांदळी गावातील गणेश गायकवाड हा जुगाराचा अड्डा चालवत आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोन पंचांना मांडवगण पेालीस चौकी येथे बोलावून मिळालेल्या बातमीचा आशय समजावून सांगितला आणि तेथे छापा मारताना पंच म्हणून हजर राहण्यासा सांगितले, त्यानुसर जुगार अड्ड्यावर छापा टाकला. गणेश गायकवाड (रा. मौजे काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) हा पळून गेला. मात्र उर्वरित नऊ जणांना पोलिसांनी पकडले. कोविड-19 या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे संचारबंदीचे आदेश लागू असतानाही एकत्र जमून तीनपानी जुगार खेळत असल्याप्रकरणी आणि भारतीय साथ रोग अधिनियम अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यता आला.
ही कामगिरी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, पोलीस शिपाई गोरे, होमगार्ड धर्मा खराडे, होम गार्ड शेख यांच्या पथकाने केली.