तुकाराम भगवान साखरे (वय ५५, रा. चिखली, पुणे) असे अपघातात ठार झालेल्या पानशेत येथील केंद्रप्रमुखाचे नाव आहे. ही घटना सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-सातारा महामार्गावरील शिवरे (ता. भोर) येथे शुक्रवारी घडली.
वेल्हा येथील शैक्षणिक बैठक संपल्यानंतर साखरे हे पुण्याकडे दुचाकीवरून चिखली येथे घरी जाण्यासाठी महामार्गावरून घरी जात होते. या वेळी एका वाहनाने त्यांना मागून धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक तरुणांनी रुग्णवाहिका बोलावली होती. मात्र रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही. या वेळी महामार्गावरून प्रवास करणारे डॉ. प्रशांत फरांदे व त्यांची पत्नी व नातेवाईक मंगेश यांनी जखमी झालेल्या केंद्रप्रमुख साखरे यांना स्वतःच्या वाहनामध्ये नसरापूर येथील सिद्धिविनायक रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच साखरे मृत झाले होते. याबाबत स्वप्नील तुकाराम साखरे रा. चिखली पुणे यांनी नसरापूर येथील राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सोबत फोटो : तुकाराम भगवान साखरे