पुणे : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरावरून केंद्र व राज्य सरकारांमध्ये वाद झडत असले तरी दोघांचेही कर जवळपास सारखेच आहेत. पेट्रोलच्या मूळ किमतीवर एकाच कारणासाठी दोन्हीही सरकारांनी वेगवेगळे कर लागू केले आहेत.
ऑल इंडिया पेट्रोल अँड डिझेल डिलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ता अली दारूवाला यांनी एका लिटर पेट्रोलचा दर १००.१५ पैसे झाला त्यावेळच्या म्हणजे काही दिवसांपूर्वीच्या अधिकृत कर आकारणीची माहिती दिली. हे दर व कर पुण्यात दिल्या जाणाऱ्या पेट्रोलवर आकारण्यात येणारे आहेत.
पेट्रोलचे (१ लिटर) दर व कर
मूळ किंमत- ३६ रुपये ११ पैसे
एक्साइज ड्यूटी- (केंद्र)- ३२.९०
वॅट (राज्य)-१७.२५
सेस (राज्य)- १०.१२
वितरक कमिशन- ३.०७
वाहतूक आणि अतिरिक्त - ०.७०
_______________________
एकूण- १००.१५
-----------------------------
डिझेलचे कर (१ लिटर)
मूळ किंमत - ३८.५५
एक्साइज (केंद्र)- ३१.८०
वॅट (राज्य)- १४.७८
सेस (राज्य)- ३.००
वितरक कमिशन- २.५८
_______________________
एकूण- ९०.७१
दारूवाला भारतीय जनता पार्टीचे राज्य प्रवक्ता आहेत. एकाच कारणासाठी केंद्र व राज्य या दोघांकडूनही कर वसूल केले जात आहेत, असे ते म्हणाले. रस्ते, शिक्षण, स्वच्छ भारत यासाठी केंद्र व राज्य दोघेही १ टक्का कर घेतात. राज्य सरकारच्या वॅट करात या सर्व गोष्टी आहेतच तसेच दुष्काळ करही आहे तरीही पुन्हा अतिरिक्त कर म्हणून या कारणाखाली कर वसूल केला जातो, असे दारूवाला म्हणाले.