पुणे : केंद्र सरकारने जाहीर केलेले ८ हजार ५०० कोटी रूपयांचे पॅकेज फसवे आहे. ही रक्कम ४ हजार ४७ कोटी रुपयांची असताना त्याचे वेगवेगळे आकडे जाहीर करण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास अडचणी कायम आहे. पुढील गाळप हंंगाम घेणे कारखान्यांना अडचणीचे असून केंद्रसरकारने वाढीव पॅकेज द्यावे अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी करताना साखरे बाबतचे सरकारचे धोरणच चुकीचे आहे अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना किफायतशीर आणि रास्त दरापोटी (एफआरपी) अजूनही १८०० कोटी रुपये दिलेले नाही. इथेनॉलचा ४० रूपयांचा प्रति लिटरचा दर वाढवून ५३ रुपये करावा. तसेच साखरेचा प्रतिक्विंटलमागे निर्धारित केलेला भाव २९०० रुपयांवरुन ३ हजार २०० रुपये करावा अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केली. साखर उद्योग अडचणीत असताना पाकिस्तानातून ३ लाख मेट्रीक टन साखर आयात करण्यात आली असून परदेशातून २१ लाख मेट्रीक टन कच्ची साखर आयात झाली आहे. ही कच्ची साखर प्रक्रिया करून बाहेर जाणे अपेक्षित होते. मात्र देशांंतर्गत बाजारातच तिची विक्री झाल्यामुळेच साखरेचे भाव पडले असल्याचे ते म्हणाले. पाटील म्हणाले, साखर उत्पादनाचा देश व राज्यपातळीवरील अंदाज चुकल्याने साखरेचे भाव खाली आले आहेत. यंदाच्या हंगामात २६० लाख मेट्रीक टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ३२७ लाख टन उत्पादन झाले आहे. राज्यातही ७२ ते ७६ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. प्रत्यक्षात १०७ लाख मेट्रीक टन उत्पादन झाले. वाढलेल्या उत्पादनामुळे साखरेच्या भावात भाव घट झाली. त्यामुळे उसाची एफआरपी द्यायची कशी असा प्रश्न आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ८० लाख टन साखर निर्यात करावी. त्यासाठी दिलेले प्रति टन अनुदान ५५ रुपयांऐवजी शंभर रुपये करावे.
केंद्र सरकारचे साखरेचे पॅकेज फसवे : हर्षवर्धन पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 8:24 PM
साखर उत्पादनाचा देश व राज्यपातळीवरील अंदाज चुकल्याने साखरेचे भाव खाली आले आहेत.
ठळक मुद्देकेंद्र सरकारने ८० लाख टन साखर निर्यात करावी.शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास अडचणी कायम