याबाबत तहसीलदार संजय पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती वाढत चालली आहे रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. पुण्यात लस उत्पादन होत असताना पुणे जिल्ह्यात लसीचा तुडवडा होत आहे. अशा वेळी केंद्र सरकार राजकीय दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाला बदनाम करण्याच गलिच्छ राजकारण करीत आहे. सदरचे गलिच्छ राजकारण थांबवा अन्यथा सिरम इन्स्टिट्यूटमधून महाराष्ट्राबाहेर लस जाऊ देणार नाही, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाअध्यक्ष महेश पासलकर, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख, शिवसेनेचे तालुका प्रमुख देविदास दिवेकर, शहर प्रमुख आनंद पळसे, अजय कटारे, नीलेश मेमाणे, कदम, विजयसिंह चव्हाण, समीर भोईटे, अजित फुटाणे, राष्टवादी युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
--फोटो क्रमांक: १३दौंड
फोटो ओळी : दौंड येथे तहसीलदार संजय पाटील यांना केंद्र शासनाच्या निषेधाचे निवेदन देताना शिवसेना राष्ट्रवादीचे पदाधिकारी.