कठीण काळात कपिल अभिजातमधील तरुण मंडळींनी मात्र सोसायटीमधील वातावरण हलकेफुलके ठेवण्यास मदत केली आणि तंत्रज्ञानामार्गे विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मनाने एकटे पडू दिले नाही. सोसायटीमधील वातावरण भयमुक्त, आनंदी आणि आल्हाददायक राहावे, म्हणून या तरूण मंडळींनी गणेशोत्सव, नाताळ, १५ आगस्ट, २६ जानेवारी हे सांस्कृतिक व राष्ट्रीय सण सगळे नियम पाळून आयोजित केले. आता लसीकरणाच्या टप्प्यात याच तरुण मंडळींनी आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून ज्येष्ठांच्या अडचणी समजून घेऊन लसीसाठी नोंदणी करणे, हॅास्पिटल, वेळ, तारीख यांची निवड करणे, त्याचबरोबर सर्वांना नेण्या-आणण्यासाठी सोबत आणि वाहनांची व्यवस्था करणे ही कामगिरी अगदी चोख बजावली. यामुळे ज्येष्ठ नागरिकांवरचा मानसिक ताणही कमी होण्यास मदत झाली.
या तरुण मंडळींसाठी एक कौतुकाची थाप म्हणून ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सुमुख रायरीकर व स्वाती रायरीकर, प्रभाकर व सुजाता पाठक, नंदकुमार व वसुधा दाणी, शरद व प्रतिभा पेंडसे, मालती गुजर या तरुण मंडळींसाठी कार्यक्रम घेतला. संजय पाठक, शिल्पा पाठक, मंदार ओक, देवयानी पाटणकर, हेमंत काळे, राजेश भांडारकर, सोनाली देशपांडे, अभय पिसे यांनी हा सोहळा आयोजित केला.
पालिका सहआयुक्त व कपिल अभिजातचे रहिवासी राजेंद्र मुठे यांच्या हस्ते प्रत्येकास सन्मानपत्र, मिठाई, गुलाबपुष्प, मास्क आणि सॅनिटायझर देण्यात आले.