लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी राज्यस्तरावरील सामाईक प्रवेश परीक्षाच (एमएचटी-सीईटी) राहणार असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून (डीटीई) स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य शासनाने पुढील शैक्षणिक वर्षासाठी ‘सीईटी’ची तयारी करण्याबाबत ‘डीटीई’ला पत्राद्वारे कळविलेआहे. त्यामुळे सध्या तरी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) की सीईटी हा विद्यार्थ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर होणार आहे.चालू शैक्षणिक वर्षापासून देशपातळीवरील वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) घेण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेश यंदा सीईटीमार्फत करण्यात आले. देशपातळीवर संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई बंधनकारक होती. ‘नीट’च्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षीपासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ ही एकच परीक्षा असणार की नाही, याबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. ‘डीटीई’च्या अधिकाºयांनाही याबाबत ठामपणे काहीही सांगता येत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.याबाबत शासनाने ‘डीटीई’ला दि. २४ जुलै रोजी पत्राद्वारेकळविले आहे. त्यामध्ये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये राज्यात ‘सीईटी’ घेण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.बारावीच्या अभ्यासक्रमावर अधिक भर१‘डीटीई’कडून मंगळवारी परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. सीईटीची पातळी, अभ्यासक्रम, पद्धती व दर्जा हा राष्ट्रीय पातळीवरील ‘जेईई’प्रमाणे निश्चित करण्यास शासनाने मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ‘सीईटी’मध्ये इयत्ता बारावीच्या अभ्यासक्रमावर अधिक भर असेल, तर इयत्ता अकरावीला कमी महत्त्व दिले जाईल.२यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून नेमका अभ्यासक्रम व त्याचे प्रमाण लवकरच जाहीर केले जाईल. या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धतीही राहणार नाही. परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांचा दर्जा हा ‘जेईई’प्रमाणे तर जीवशास्त्र विषयाचा दर्जा ‘नीट’प्रमाणे असेल, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.जेईईचे सावट दूरराज्यातील विद्यार्थी व पालकांमध्ये जेईईबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. पण आता राज्य शासनाकडून पहिल्यांदाच सीईटीबाबत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सीईटीची तयारी करण्याबाबत सूचना देण्यात आल्याने राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जेईईचे सावट सध्या तरी दूर झाले असून विद्यार्थ्यांसाठी हे फायदेशीर ठरणार आहे.- हरीष बुटले,प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासकअखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) अद्याप देशपातळीवरील अभियांत्रिकी प्रवेशासाठी ‘जेईई’ बंधनकारक केलेली नाही. त्यामुळे जेईईमध्ये सहभागी होण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाचा होता. त्यानुसार शासनाकडून ‘डीटीई’ला सीईटीच्या तयारीबाबत पत्राद्वारे कळविले आहे. त्यानुसार ‘सीईटी’ घेतली जाईल.- दयानंद मेश्राम, सहसंचालकतंत्रशिक्षण संचालनालय
अभियांत्रिकीसाठी राज्यात सीईटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 4:03 AM