या वेळी बैठक प्रसंगी यात्रासमिती प्रमुख भैरवनाथ सेवा मंडळ अध्यक्ष बाबाजी घिसरे, श्रीनाथ गोसावीबुवा तरुण मंडळ अध्यक्ष रमेश कटके, वीर नेताजी तरुण मंडळ अध्यक्ष बाळासाहेब सो.कटके, सरपंच संजय दि. कटके, उपसरपंच प्रणोती रामहरी कटके, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील सचिन दळवी व प्रमुख गावकारभारी उपस्थित होते.
पूर्वापार सुरू असलेली परंपरा खंडित होऊ नये म्हणून, मोजक्याच सेवेक-यांच्या उपस्थितीत, शासनाने कोरोनासंदर्भातील नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. गावातील कोणीही आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार यांना यात्रेदिवशी गावात बोलावू नये.तसे आढळल्यास यात्रा कमिटीच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
तिथीप्रमाणे चैत्र पौर्णिमा झाल्यानंतर द्वादशी व त्रयोदशीला येणाऱ्या भिवरी येथील श्री भैरवनाथ यात्रा दरवर्षीच मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यात्रेच्या हा दोन्ही मुख्य दिवशी भिवरी पंचक्रोशीतील कामानिमित्त बाहेरगावी असलेले अनेक नागरिक दरवर्षीच न चुकता यात्रेनिमित्त आपल्या गावाकडे येतात. मात्र, मागील वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, मागील वर्षीचीही श्री भैरवनाथ यात्रा कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आली होती. याही वर्षी यात्रे दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यात्रा समिती व ग्रामपंचायत भिवरी यांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बातमीसोबत फोटो पाठवित आहे.
y smartphone.