शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चाकण बाजार : कांद्याची आवक वाढून भावात घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 1:51 AM

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली, तर बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली.

चाकण - खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढून भावात घसरण झाली, तर बटाट्याची आवक घटून भावात वाढ झाली. भुईमूग शेंगा व लसणाची आवक घटली. तरकारी बाजारात वाटाण्याची मोठी आवक वाढून भावात घसरण झाली. मेथी व कोथिंबिरीची आवक घटून भाव स्थिर राहिले. जनावरांच्या बाजारात गाय, बैल, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांच्या विक्रीत घट झाली. बाजारात एकूण साडेतीन कोटींची उलाढाल झाली असल्याची माहिती सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिली.चाकण बाजारात कांद्याची एकूण आवक २९०९० क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक ३०९० क्विंटलने वाढून भावात १५० रुपयांची घसरण झाली. कांद्याला ७५० रुपये भाव मिळाला. तळेगाव बटाट्याची एकूण आवक १०१५ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक ८५ क्विंटलने घटून भावात ३०० रुपयांनी वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव ९०० रुपयांवरून १२०० रुपयांवर स्थिरावला. चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण ४८३ पोती, वाटाण्याची १०३४ पोती, गवारीची ७८ पोती व टोमॅटोची ८९५ क्रेट्स आवक झाली. हिरव्या मिरचीला ४००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.शेतमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे :कांदा - एकूण आवक - २९०९० क्विंटल. भाव क्रमांक १ : ७५० रुपये, भाव क्रमांक : ४०० रुपये, भाव क्रमांक ३ : २०० रुपये.बटाटा - एकूण आवक - १०१५ क्विंटल. भाव क्रमांक १ : १२०० रुपये, भाव क्रमांक २ : ९०० रुपये, भाव क्रमांक ३ : ७०० रुपये.भुईमूग शेंग - एकूण आवक - ३ क्विंटल. भाव क्रमांक १ : ५५०० रुपये, भाव क्रमांक २ : ५००० रुपये, भाव क्रमांक ३ : ४७०० रुपये.लसूण - एकूण आवक - ४ क्विंटल. भाव क्रमांक १ : २५०० रुपये, भाव क्रमांक : २००० रुपये, भाव क्रमांक ३ : १५०० रुपये.फळभाज्या : चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती १०० किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :हिरवी मिरची - ४८३ पोती (२५०० ते ४००० रु.), टोमॅटो - ८९५ पेट्या (४०० ते १००० ), कोबी - २८४ पोती ( ८०० ते १२००) ,फ्लॉवर - ३९२ पोती (५०० ते १०००), वांगी - ४१२ पोती (१००० ते २०००), भेंडी - ४१२ पोती (२००० ते ३५००),दोडका - २७४ डाग (२५०० ते ३५०० रु.), कारली - ३५२ डाग (२५०० ते ३५००), दुधीभोपळा - २५१ पोती (१००० ते २००० रु.),काकडी - ३४५ पोती (१००० ते १८००), फरशी - १३० पोती (३००० ते ४००० रु.), वालवड - २४८ पोती (१००० ते २००० रु.),गवार- ७८ पोती (५००० ते ६०००), ढोबळी मिरची- ५१४ डाग (२००० ते ३०००), चवळी - ७० डाग (१५०० ते २५००),वाटाणा - १०३४ पोती (९०० ते १५००), शेवगा - ४० डाग (३००० ते ४०००), गाजर - २१६ डाग (९०० ते १४००)पालेभाज्या : चाकण येथील पालेभाज्यांच्या बाजारात भाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रती शेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :मेथी - एकूण २१ हजार ५१३ जुड्या (१०० ते ४०० रुपये), कोथिंबीर- एकूण २४ हजार ३१० जुड्या (१०० ते ५००),शेपू - एकूण २ हजार ४८४ जुड्या (५०० ते ९००), पालक - एकूण ५ हजार ६८९ जुड्या (३०० ते ५००).बटाट्याची आवक घटून भावात वाढबटाट्याची आवक घटून भावात वाढ, भुईमूग शेंगा व लसणाची आवक घटलीगवार तेजीत, भाव ६००० रुपये क्विंटल, वाटाण्याच्या भावात घसरणवाटाणा भाव १५ रुपये किलो, मेथी व कोथिंबिरीची आवक घटली.जनावरांच्या विक्रीत घट, बाजारात साडेतीन कोटींची उलाढाल

टॅग्स :onionकांदाPuneपुणे