पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन स्मार्ट करण्यासाठी अभियान राबविले होते. अवघ्या महिनाभरात सर्व पोलीस ठाण्याच्या स्वच्छतासह पोलीसठाणे अंतर्गत अभिलेख व्यवस्थित व अद्ययावतीकरणसह सेवा ॲप तसेच नागरिकांना सोयी-सुविधांसह तातडीने पोलीस प्रतिसाद अशा बाबींचे निकषांची पूर्तता करण्याचे ध्येय होते, यात चाकण पोलीस स्टेशनने सर्व बाबींची पूर्तता तंतोतंत करून अव्वल स्थान पटकवले. त्यानिमित्त चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात पोलीस ठाण्यात सन्मान करण्यात आला.
या वेळी आयुक्त कृष्ण प्रकाश, आमदार दिलीप मोहित, अण्णा बनसोडे, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, जिल्हा काँग्रेस प्रवक्ते निलेश कड, जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष जमीरभाई काझी, अशोक बिरदवडे, काँग्रेस शहराध्यक्ष आनंद गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राम गोरे, अल्पसंख्याक अध्यक्ष मुबिन काझी, व्यंकटेश सोरटे उपस्थितीत होते.
------------------------------------------------------
फोटो क्रमांक ०६चाकण पोलीस ठाणे स्मार्ट
फोटो - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्मार्ट पोलीस ठाण्याचा सत्कार स्वीकारताना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रकाश धस.