पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनची नुकत्याच झालेल्या कोअर कमिटी मिटिंगच्या बैठकीत एक मताने निर्णय घेऊन, दत्तात्रय भेगडे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच उपाध्यक्ष- भालचंद्र ऊर्फ बाळासाहेब बोराटे,
कार्याध्यक्ष- दिपक कलापुरे,सचिव- बंटी भालेकर,
खजिनदार - दशरथ पानमंद तर सल्लागार- काळूराम गायकवाड,प्रमोद बागलाने,देवदत्त रावल यांची निवड करण्यात आली.
बस वाहतूक व्यावसायिकांना न्याय मिळवून देणे, बँका,फायनान्स कंपन्या यांच्याकडून वारंवार होणारा त्रास कमी करणे,परिवहन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळवून देणे, परिवहन कर व वाहन विमा यामध्ये सवलत मिळवून देणे, मिळालेल्या संधीचे सोने करत असताना वाहनधारक व्यवसाय बंधूंना या कठीण काळातून बाहेर काढून मदत करणे व पुनर्वसन करणे हीच आपली जबाबदारी असल्याचे भेगडे यांनी सांगितले.