चाकण : महाळुंगे येथील जेबीएम या कंपनीने काही कामगारांना कामावरून कमी केले, तसेच काहींना दुसऱ्या प्रकल्पात त्यांची बदली केली. याला विरोध करत मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाळुंगे येथील कंपनीतच कामगारांना कामावर घेण्याची मागणी करून कोरोना काळात बेकायदेशीरपणे मोर्चा काढला. यामुळे मनसे शहराध्यक्ष जिल्हाध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी आणि अन्य साडेतीनशे जणांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे पुणे शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे, मनसे कामगार सेना सरचिटणीस सचिन गोळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, अशोक साबळे, कामगार सेना सरचिटणीस मनोज खराबी, पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक सचिन चिखले तसेच कंपनीमधून कामावरून कमी केलेले व दुसऱ्या प्रकल्पात बदली केलेले कामगार आणि मनसे पक्षाचे कार्यकर्ते अशा एकूण तीनशे ते साडेतीनशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसे पक्षाच्या वतीने ८ फेब्रुवारीला दुपारी चाकण एमआयडीसी मध्ये कंपनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले होते. जेबीएम या कंपनीच्या समोर सदरचे आंदोलन करण्यात आले होत.