शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

चाकणमधील गुन्हेगारीला चाप!

By admin | Published: April 25, 2015 5:03 AM

औद्योगिक भागात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुंडांवर चाकण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे

चाकण : औद्योगिक भागात सातत्याने गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या गुंडांवर चाकण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. तीन गुंडांसह त्यांच्या अन्य साथीदारांवर कारवाईची परवानगी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रितेश कुमार यांच्याकडून घेण्यात आली आहे. संतोष कांतिलाल गुजर, बबुशा ज्ञानोबा नाणेकर व विशाल कांतिलाल गुजर ( सर्व रा. नाणेकरवाडी, ता.खेड, जि. पुणे ) या तीन गुंडांवर ही मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची परवानगी महानिरीक्षकांनी दिली आहे. नुकतीच गुंड श्याम दाभाडे आणि त्याचे तीन साथीदारांवर कारवाई केल्यानंतर या तिघांवर ही कारवाई होणार असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. एमआयडीसीमधील नेहमीच्या गुन्हेगारी कारवायांच्या पाश्वर्भूमीवर पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्या मार्गदशर्नाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विजय मगर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजयकुमार पाटील व चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांनी कडक उपाय योजना सुरु केल्या आहेत. त्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या वरील सर्वाना कारवाईच्या कात्रीत आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. चाकण परिसरात प्रमुख सहा गुंडांसह त्यांच्या साथीदारांवर मोक्काखाली कारवाई करण्यात येणार आहे. चाकण पोलिसांच्या धडक भूमिकेमुळे गुन्हेगारीला चाप बसणार आहे. चाकण पोलिसांनी वरील सर्व गुंडांवर चाकण, शिक्रापूर, देहूरोड, तळेगाव, लोणीकंद आदी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, लुटमार, आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांची माहिती संकलित करून त्यांच्यावर कारवाईची प्रस्ताव चाकण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी.बी.पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांना पाठविला होता . (वार्ताहर)