चाकण : चाकणनजीकच्या नाणोकरवाडीत तब्बल 3 वर्षे दवाखाना धाटून व्यवसाय करणारा बोगस डॉक्टर आढळून आला आहे.
चाकण पोलिसांनी नाणोकरवाडी (करपे वस्ती) येथे बोगस दवाखाना चालविणा:या डॉ. सूरज सुकुमार सरकार (वय 25, सध्या रा. नाणोकरवाडी मूळ रा. बाजूल, नंदियाराज पश्चिम बंगाल) नावाच्या आणखी एका मुन्नाभाई बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय दंड विधान कलम 42क् मेडिकल प्रॅक्टिशनल अॅक्ट 1961, 33,34,35,36 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी येथून जवळच असलेल्या निघोजे (डोंगर वस्ती) येथे स्नेहा क्लिनिक नावाने दवाखाना चालविणा:या डॉ. बी. सरकार ऊर्फ बिराज सरकार नावाच्या अशाच एका आठवी पास बोगस डॉक्टरवरही गुन्हा दाखल करून गजाआड करण्यात आले होते. त्यामुळे बोगस डॉक्टरांची या भागातील नेमकी संख्या किती, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत करंजविहिरे (ता. खेड) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश श्यामराव ढेकळे यांनी चाकण पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरला ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक पुरावे व पदव्या आढळून आले नाहीत.
(वार्ताहर)
4चाकण परिसरात मोठय़ा प्रमाणात औद्योगिक वसाहत असल्याने राज्यभरातून कामगार वर्ग याठिकाणी एकवटला आहे. बहुतांशी कामगार हा अकुशल असल्याने व कमी पैशात उपचार करून घेता येत असल्याने तो खासगी डॉक्टरकडे जाणो पसंत करतो. मग तो डॉक्टर खराखुरा डॉक्टर आहे की बोगस याकडे त्याचे लक्ष नसते. त्यामुळे बोगस डॉक्टरांचे फावते.