शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

चाकण बाजारभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:09 AM

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात मोठी घसरण ...

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली. तळेगाव बटाट्याची आवक स्थिर राहूनही बाजारभावात वाढ झाली. भुईमूग शेंगांची आवक घटल्याने भावात घट झाली, लसणाची आवक वाढूनही भावात वाढ झाली.

कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी, भेंडी, कारली, काकडी, दुधी भोपळा व दोडक्याच्या आवक घटूनही बाजारभावात किंचित वाढ झाली. पालेभाज्यांच्या बाजारात मेथी, कोथिंबीर, शेपू भाजीची आवक घटूनही भावात घसरण झाली. जनावरांच्या बाजारात जर्शी गाय व म्हशीच्या संख्येत घट झाली, तर बैल, शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येत वाढ झाली. एकूण उलाढाल ४ कोटी ५ लाख रुपये झाली.

चाकण येथील बाजारात कांद्याची एकूण आवक ४५०० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक २२७५ क्विंटलने वाढल्याने कांद्याचे भावात ३०० रुपयांची घसरण झाली. तळेगाव बटाट्याची एकूण आवक ७५० क्विंटल झाली. गेल्या शनिवारच्या तुलनेत ही आवक स्थिर राहूनही बटाट्याच्या भावात २०० रुपयांची वाढ झाली. बटाट्याचा कमाल भाव १,६०० रुपयांवरून १,८०० हजार रुपयांवर पोहोचला. लसणाची एकूण आवक ११ क्विंटल झाली. मागील आठवड्याच्या तुलेनत १ क्विंटलने वाढ होऊनही बाजारभावात १,००० रुपयांची वाढ झाली. भुईमूग शेंगांची ७ क्विंटल आवक झाल्याने भाव ६,००० स्थिरावले.

* चाकण बाजारात हिरव्या मिरचीची एकूण आवक १५५ क्विंटल झाली. हिरव्या मिरचीला ३,००० ते ४,००० रुपये असा भाव मिळाला.

* शेतीमालाची एकूण आवक व बाजारभाव पुढीलप्रमाणे –

कांदा - एकूण आवक - ४,५०० क्विंटल. भाव क्रमांक १. ३,२०० रुपये, भाव क्रमांक २. २,७०० रुपये, भाव क्रमांक ३. २,००० रुपये.

बटाटा - एकूण आवक - ७५० क्विंटल. भाव क्रमांक १. १,८०० रुपये, भाव क्रमांक २. १,५०० रुपये, भाव क्रमांक ३. १,२०० रुपये.

* फळभाज्या -

चाकण येथील फळभाज्यांच्या बाजारात एकूण आवक डागांमध्ये व प्रती दहा किलोंसाठी डागांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

टोमॅटो - ३५ पेट्या ( ३०० ते ६०० रू. ), कोबी - ४२ पोती ( २०० ते ४०० रू. ), फ्लॉवर - ४६ पोती ( ४०० ते ६०० रू.),वांगी - १४ पोती ( २,००० ते ३,००० रू.). भेंडी - १४ पोती ( २,००० ते ३,००० रू.). दोडका - १४ पोती ( २,००० ते ३,००० रू.). कारली - १४ डाग ( १,५०० ते २,५०० रू.). दुधीभोपळा - १० पोती ( ५०० ते १,००० रू.),काकडी - १६ पोती ( ५०० ते १,००० रू.). फरशी ५ - पोती ( १,००० ते २,००० रू.). वालवड - १२ पोती ( ३,००० ते ४,००० रू.). गवार - ६ पोती ( ३,५०० ते ४,५०० रू.). ढोबळी मिरची - १६ डाग ( १,५०० ते २,५०० रू.). चवळी - ४ पोती ( १,०००) ते २,०००रू.), वाटाणा - ४७५ पोती ( १,८०० ते २,२००रू.), शेवगा - ४ पोती ( ४,००० ते ६,००० रू.). गाजर - ९० पोती ( १,००० ते १,२०० रू.).

* पालेभाज्या –

राजगुरूनगर येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात मेथीची ६० हजार जुड्यांची आवक होऊन मेथीला ५०१ ते १,६०० रुपये प्रतिशेकडा जुड्यांना भाव मिळाला. कोथिंबिरीची ७५ हजार जुड्यांची आवक होऊन प्रतिशेकडा जुड्यांना १०१ ते १,००० रुपये एवढा भाव मिळाला.

चाकण येथील पालेभाज्यांच्या मुख्य बाजारात पालेभाज्यांची एकूण आवक जुड्यांमध्ये व प्रतिशेकडा जुड्यांना मिळालेले भाव पुढील प्रमाणे -

मेथी - एकूण १४ हजार ५२० जुड्या ( ५०० ते १,००० रू. ), कोथिंबीर - एकूण २३ हजार २५० जुड्या ( ३०० ते ६०० रू. ), शेपू - एकूण ४ हजार ९६० जुड्या (३०० ते ६०० रू. ), पालक - एकूण ३ हजार ५०० जुड्या ( २०० ते ४०० रू.).

* जनावरे -

चाकण येथील जनावरांच्या बाजारात विक्रीसा ठी आलेल्या ५० जर्शी गाईंपैकी २५ गाईंची विक्री झाली. ( १०,००० ते ४,०००० रू. ), १५० बैलांपैकी ९० बैलांची विक्री झाली.( १०,००० ते ३,०००० रू. ), १७० म्हशींपैकी १२२ म्हशींची विक्री झाली. ( १०,००० ते ६,०००० रू. ), शेळ्या - मेंढ्यांच्या बाजारात विक्रीसाठी आलेल्या ९३४५ शेळ्या - मेंढ्यापैकी ८९१० मेंढ्यांची विक्री होऊन त्यांना १,५०० ते १२,००० रू. इतका भाव मिळाला.

चाकण बाजारात कोथिंबीरचा लिलाव सुरू.