- चंद्रकांत मांडेकर चाकण : नगर परिषद सध्या हजार लिटरला ८ रुपये देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून विकतचे पाणी चाकणकरांना पुरवत आहे. सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. यामुळे पाण्यासाठी तशी ‘बोंब’ शहरात होत नाही. मात्र, २०११च्या जनगणनेनुसार चाकणची लोकसंख्या ४१ हजार ११३ अशी असली, तरी शहरात त्याच्या दुप्पट म्हणचे लाखाच्या आसपास लोक राहतात. हा नागरीकरणाचा वाढता वेग पाहता, भविष्यात पाणी ही मोठी समस्या चाकण नगर परिषदेसमोर असणार आहे. यासाठी शहराला स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेची गरज आहे.भामा-आसखेड धरणातील पाणी एमजीपीकडून काही भागात, तर भामा नदीतून जलशुद्धीकरण करून उर्वरित भागासाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या जलशुद्धीकरण केंद्राचे नव्याने अद्ययावतीकरण केल्याने नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा सुरू झाला आहे. शहराचे दोन विभाग करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे.ग्रामपंचायत काळात चाकणचा पाणीप्रश्न हा गंभीर होता. मात्र, नगर परिषद झाल्यानंतर टंचाईच्या झळा कमी झाल्या. मात्र, शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. एमआयडीसी व तरंगती लोकसंख्या विचारात घेता सुमारे एक लाथ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी ५.५ टक्के इतक्या पाण्याची गरज लागेल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित पाणीपुरवठा योजनेचे सर्वेक्षण केले असून, सरकारच्या अमृत जलधारा या योजनेअंतर्गत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.चाकण शहरासह सर्व लहानमोठ्या गृहप्रकल्पांना समाधानकारक पाणी उपलब्ध झाल्यानंतर लवकरच पाणीपुरवठा मीटर सक्तीचे करणार आहे. अनधिकृत नळ कनेक्शन बंद करणार आहे. अतिरिक्त पाणीगळतीकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले.असा होतो पाणीपुरवठा४चाकण शहराला सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. पहिल्या दिवशी प्रभाग क्रमांक १, २, ३, १३, १४, १५, १६, २०, २१ व २२ (आंबेठाण रोड, राणूबाई मळा, देशमुखआळी, दावडमळा, भुजबळआळी व संपूर्ण शिक्रापूर) या भागासाठी भामा-आसखेड धरणातून पाणी विकत घेऊन पुरवठा करण्यात येतोे.४दुसºया दिवशी प्रभाग क्रमांक ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १७, १८, १९ व २४ (संपूर्ण चाकण गावठाण, एकतानगर, आगरवाडी, राक्षेवाडी, पठारवाडी, माळआळी, बाजारपेठ व खंडोबामाळ) या परिसरासाठी भामा नदीवरील बंधाºयातील पाणी जॅकवेलमार्फत जलशुद्धीकरण केंद्रातील टाक्यांमधून पावडर, क्लोरिन गॅसचा योग्य प्रमाणात वापर करून फिल्टर करून पुरवठा करण्यात येत आहे.चाकण शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेतल्यास, स्वतंत्र पाणी योजनेची गरज आहे. त्यानुसार भामा-आसखेड धरणातील ठराविक टक्के पाणी आरक्षित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले आहे. केंद्र सरकारच्या अमृत जलधारा योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.- मंगल गोरे, नगराध्यक्षाचाकण शहराच्या विकासासाठी निधीची मोठी गरज आहे. सध्या नव्याने जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे चाकणकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागात अजूनही कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे, त्याबाबत लवकरच उपाययोजना करण्यात येईल.- राजेंद्र गोरे, उपनगराध्यक्ष
चाकणला स्वतंत्र पाणी योजनेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 2:19 AM