नीरज जसराम बन्सल (वय २१ वर्षे, सध्या रा.नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. प्रेमनगर, ता.जोरा,जि.मुरेना,मध्य प्रदेश ) यास गुटखा विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याच्याकडे सदर गुटखा पुरवठादार अंकुर गुप्ता ( रा.चाकण,ता.खेड ) याच्या कडून घेतला असल्याचे पोलीस तपासत समोर आले. पोलिसांनी नीरज यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुटखा जातेगाव बु.(ता.शिरूर,जि. पुणे ) येथून घेतला.पोलिसांनी वरील ठिकाणी समक्ष जाऊन तपासणी केल्यावर गुप्ता याचा टेम्पो मिळून आला.गुटखा बंदी असतानाही बेकायदेशीररित्या टेम्पो क्रमांक ( एम.एच.१४ जी यु ७६३३ ) मधून विविध कंपन्यांच्या गुटख्याची पोती भरलेली आढळून आली.टेम्पोमध्ये ५ लाख १८ हजार ५०० रुपयांचा विविध कंपन्यांचा सुगंधी पान मसाला,तंबाखूजन्य गुटखा मिळून आला.
बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी टेम्पो ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५ लाख १८ हजार ५०० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहे.तसेच ३ लाख ५० हजार रुपये किमतींचा टेम्पो असा ८ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय जगदाळे,सुरेश हिंगे,आर.एम.झनकर,हनुमंत कांबळे,संदीप सोनवणे,मच्छिंद्र भांबुरे,निखिल वर्पे,मनोज साबळे,अशोक दिवटे,प्रदीप राळे आदींनी कारवाई केली.
चाकण पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा व आरोपी पकडला.