चाकण शहरातील कोरोनाचे रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली असून,विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करत अनेकांना काठीचा प्रसादही देण्यास सुरुवात केली आहे.वीकेंड लॉकडॉऊन लागू करण्यात आले असतानाही अनेक जण विनाकारण घराबाहेर फिरत असतात तसेच दुकानदारही मागील बाजूने किंवा दुकानाची अर्धी शटर उघडून दुकानदारी करत आहे. शासनाने घालून दिलेल्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ दुकाने उघडी ठेवतात.अशांवर धडक कारवाई करत, पुढील काळात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे संकेत चाकण पोलिसांनी दिले आहेत.
* चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत स्वतः रस्त्यावर उतरून कारवाई करत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही उत्साह वाढतो आहे.रोज शेकडोंच्या संख्येत रुग्ण आढळत आहेत. तरीही लोक विनाकारण फिरत आहेत.
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर सतत कारवाईचे सत्र सुरू ठेवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चाकण पोलीस माणिक चौकात नाकाबंदी करताना.