शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

चाकणलाही नगर परिषद!

By admin | Published: April 08, 2015 3:44 AM

राजगुरुनगरनंतर चाकण नगर परिषद स्थापण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर मान्यता दिली

चाकण : राजगुरुनगरनंतर चाकण नगर परिषद स्थापण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर मान्यता दिली. ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे चाकण नगर परिषदेची अधिकृत घोषणा केली व अधिसूचना प्रसिद्ध करून जारी करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने आजच प्रसिद्ध केले होते. अखेर ते खरे ठरले. जलसंधारणमंत्री विजय शिवतारे व महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत खेडचे आमदार सुरेश गोरे यांनी ही अधिसूचना स्वीकारली व मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. नगर परिषदेच्या प्रभारी प्रशासकपदी तळेगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिनांक ६ एप्रिल २०१५ पासून चाकण शहरातील सर्व्हे नं १ ते २५५५ चा नगर परिषदेमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडनंतर नवे ‘आॅटोमोबाईल हब’ म्हणून चाकण उदयास आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत असणाऱ्या चाकणचे अल्पावधीतच शहरात रूपांतर झाले आहे.चाकण शहरात राहण्यास येणाऱ्या नागरिकांना पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याच्या चर्चा सुरू झाल्या. महापालिकेने चाकणचा समावेश करून घेण्याचा प्रस्तावही सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चाकण हे पिंपरी-चिंचवड शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असल्याने त्याचा समावेश महापालिकेत न करता स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करणे योग्य असल्याचा अभिप्राय राज्य सरकारला दिला होता. तसेच पिंपरी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनीही १० जुलै २०१४ रोजी चाकण हे गाव महापालिका हद्दीत समावेश करणे शक्य नसल्याचा अभिप्राय राज्य सरकारला कळविला होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी चाकण नगरपरिषदेच्या स्थापनेची राज्य सरकारकडे शिफारस केली होती. राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागानेही नगर परिषद स्थापनेला सहमती दर्शविली असल्याने चाकण ग्रामपंचायतीचे स्वतंत्र नगर परिषदेत रूपांतर करण्यासाठी राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत अंतिम अधिसूचनेच्या प्रस्तावावर आज अधिसूचना जारी करण्यात आली. चाकण नगर परिषद स्थापन झाल्याची अंतिम अधिसूचना सरकारमार्फत आज प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे वृत्त ‘लोकमत’ने आजच प्रसिद्ध केले होते. ते अखेर खरे ठरले. यासाठी ‘लोकमत’ने वेळोवेळी प्रसिद्धी देऊन पाठपुरावा केला होता. तसेच आरटीआय कार्यकर्ते नीलेश कड यांनीही याबाबत पत्रव्यवहार केला होता. (वार्ताहर)