अमोल मचाले - पुणो
‘‘जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धा ही बुद्धिबळ विश्वातील प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. यात जगभरातील अव्वल खेळाडू आपली क्षमता पणाला लावतील. त्यामुळे साहजिकच विजेतेपद मिळवणो अवघड आहे पण ते अशक्य नाही. मला माङया क्षमतेवर पूर्णपणो विश्वास आहे,’’ अशा शब्दांत या स्पर्धेतील महाराष्ट्राचे आशास्थान असलेल्या ग्रॅण्डमास्टर विदीत गुजराथीने विजेतेपद पटकावण्याचा विश्वास व्यक्त केला.
अहमदनगर रोडवरील हॉटेल हयातमध्ये रविवारपासून (दि. 5) या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. बुद्धिबळ या अवघड खेळाच्या ग्रॅण्डमास्टरला साजेसा कमालीचा शांत पण अगदीच ‘डाऊन टू अर्थ’ असलेल्या विदीतने स्पर्धेच्या पूर्वसंध्येला ‘लोकमत’सोबत मनमोकळा संवाद साधला.
स्पर्धेच्या तयारीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ‘‘स्पर्धेसाठी विशेष अशी तयारी केलेली नाही. नेहमीप्रमाणो रोज 5 तास सराव सुरू आहे. सोबतच चित्त एकाग्र करणो, दीर्घ लढतींसाठी आवश्यक शारीरिक आणि मानसिक क्षमता अधिक विकसित करण्यावर भर देत आहे. या स्पर्धेत मला चौथे मानांकन आहे. अनुक्रमे पहिले तीन मानांकन असलेले रशियाचा व्लादिमीर फेडोसीव, नेदरलँडचा रॉबीन व्ॉन कॅ म्पेन आणि चीनचा यी वेई हे बलाढय़ प्रतिस्पर्धी असतील. या तिघांविरुद्धही मी खेळलेलो नाही.
प्रतिस्पध्र्याच्या क्षमतेबद्दल मला अर्थातच आदर आहे, पण भीती नाही. अलीकडील काळात माझा खेळ मनासारखा होत आहे. यामुळे कोणत्याही आव्हानाचा यशस्वीपणो सामना करण्यास मी सज्ज आहे.’’ 2क्11मध्ये भारतात सर्वप्रथम चेन्नईत ही स्पर्धा झाली. यात विदीत 11वा आला होता. 2क्13मध्ये टर्कीत झालेल्या स्पर्धेत त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
या वेळी मात्र राज्यात प्रथमच होणा:या या स्पर्धेत पदकाचा रंग बदलण्याचा निर्धार विदीतच्या बोलण्यातून जाणवत होता. मोठय़ा स्पर्र्धामध्ये कधीकधी एक डाव 4 ते 5 तास चालतो. अशा वेळी शरीर आणि मनाच्या क्षमतेची कसोटी लागते.
‘होम ग्राउंड’चा थोडा लाभ मिळणार..
इतर खेळांप्रमाणो बुद्धिबळामध्ये ‘होम ग्राउंड’वर खेळण्याचा लाभ मिळतो का, या प्रश्नाच्या उत्तरात विदीत म्हणाला, ‘‘काही छोटय़ा गोष्टींचा पण महत्त्वपूर्ण ठरू शकेल असा लाभ नक्कीच मिळतो. आपल्या राज्यात ही स्पर्धा होत असल्याने मला ‘जेटलॅग’चा त्रस होणार नाही. दीर्घ पल्ल्याच्या विमान प्रवासाचा विपरीत परिणाम होतो.. झोपेचा त्रस होतो. अमेरिकेत एक स्पर्धा खेळण्यासाठी गेलो असता मला असा त्रस झाला. साहजिकच याचा परिणाम कामगिरीवर झाला. पण आम्ही याकडे खेळाचा भाग म्हणूनच पाहतो. या वेळी महाराष्ट्रातच ही स्पर्धा होणार असल्याने मला असा त्रस होणार नाही. योग्य विश्रंती मिळून मी खेळावर लक्ष केंद्रित करू शकेल. विदेशात खेळताना अनेकदा तेथील खाद्यपदार्थ आवडत नसले तरी खावे लागतात. याचाही परिणाम खेळावर होण्याची शक्यता असते. या स्पर्धेत मला ती अडचण नसेल. शिवाय चाहत्यांचे पाठबळदेखील ‘होम ग्राउंड’वर लाभते.’’
विरंगुळा म्हणून टीव्ही शो अन् कॉम्प्युटर गेम
खेळ आणि खेळासाठी आवश्यक बाबींव्यतिरिक्त विरंगुळा म्हणून विदीत अमेरिकन टीव्ही शो आणि कॉम्प्युटर गेम खेळतो. ‘‘कितीही नाही म्हटले तरी स्पर्धेदरम्यान दबाव असतोच. यातून बाहेर पडण्यासाठी मी प्रेरणा देणारी गाणी ऐकतो. प्रत्यक्ष डाव खेळायला जाताना दबावाला सामोरा जाण्यासाठी मी विशेष काहीही करीत नाही. माङो मन त्या वेळी शांत आणि सकारात्मक असते,’’ असे विदीतने नमूद केले.