शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

कुलगुरू निवडीचे समितीसमोर आव्हान

By admin | Published: May 12, 2017 5:35 AM

नवीन विद्यापीठ कायदा, शिक्षणक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, शिक्षणाच्या माध्यमातून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नवीन विद्यापीठ कायदा, शिक्षणक्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन, शिक्षणाच्या माध्यमातून कौशल्याधारित प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद वाढवणे अशा सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठाला पुढे घेऊन जाणाऱ्या योग्य व्यक्तीची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड करण्याचे मोठे आव्हान कुलगुरू शोध समितीसमोर आहे, असे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण निगवेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुणे विद्यापीठाच्या स्थापनेपासून डॉ. एम. आर. जयकर ते डॉ. ह. वि. पाटसकर यांच्यापर्यंत केवळ कुलपती हे कुलगुरू ठरवत होते. १९७० मध्ये बा. पां. आपटे हे पहिले पगारी कुलगुरू नेमले गेले की, जे पूर्णवेळ काम करणारे सर्वाधिकारी ठरले. त्यानंतर विसाव्या शतकामध्ये कुलगुरूंची निवड करण्यासाठी एक शोध समिती स्थापन करण्यात आली. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून कुलगुरू शोध समितीच्या माध्यमातून कुलपती कार्यालयाकडे अंतिम यादी देण्याबरोबरच सरकारतर्फे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याबरोबरही कुलपतींनी चर्चा करण्यास सुरुवात केली. याचा अर्थ शिक्षणाच्या, स्वायत्ततेच्या आणि गुणवत्तेच्या घटकांवर राजकीय मतांचा सामाजिक घटक परिणाम करू लागला आहे. कार्यक्षम व्यक्तिमत्त्व व नेतृत्व घडविणारे व्यक्ती केंद्र म्हणून विद्यापीठांकडे पाहिले जाते. त्यामुळेच विद्यापीठाचे कुलगुरू ही फार महत्त्वाची व्यक्ती बनली आहे, असे नमूद करून निगवेकर म्हणाले, आपल्या देशात शिक्षणाची चौकट चार भिंतींच्या आत अजून अडकून पडली आहे. परदेशातील विद्यापीठांनी चौकट तशीच ठेवली. परंतु, संगणकशास्त्राचा कौशल्याने वापर करत संदेश दळणवळण हा शिक्षणाचा अविभाज्य घटक बनवला. एकविसावे शतक संपण्यापूर्वी संदेश दळणवळणाच्या प्रक्रियेमध्ये संगणक आणि ‘स्मार्ट फोन’ जीवनाचा अविभाज्य घटक बनला. या सर्वांचा विचार कुलगुरूंना करावा लागेल. विद्यापीठाला पुढे घेऊन जाण्याबरोबरच विद्यापीठाचे स्वातंत्र्य सांभाळणेसुद्धा गरजेचे आहे. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय व संशोधन संस्थांची संख्या ६५० च्या वर गेली आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून चॉइस बेस्ट क्रेडिट सिस्टीमची अंमलबजावणी करावी लागणार आहे. कायद्याच्या माध्यमातून महाविद्यालयांना सक्षम करायचे आहे. तसेच, तरुणाईला कायद्याच्या चौकटीत राहून विद्यापीठाच्या यंत्रणेचे दरवाजे खुले करण्यात आले आहेत. या सर्वबाबींचा विचार करून ‘कुलगुरू शोध समिती’ला निवडक आणि योग्य उमेदवारांची शिफारस कुलगुरू पदासाठी राज्यपालांकडे करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यात समितीला यश मिळेल, असा विश्वासही निगवेकर यांनी व्यक्त केला.