शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

सवाईचे महात्म्य टिकविण्याचे नवोदितांसमोर आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 6:56 PM

महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे.

ठळक मुद्देयंदाच्या वर्षीपासून मुकुंदनगर मधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलच्या जागेत स्थलांतरित सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उद्या ( बुधवार) पासून सुरूवात यंदा 13 नवोदित कलाकारांना महोत्सवात संधी

पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवात भारतीय अभिजात संगीत विश्वात मानाचे स्थान मिळविलेल्या दिग्गज कलावंतांपेक्षा नवोदित कलाकारांची संख्या अधिक आहे.  त्यामुळे नव्या जागेत सवाईचे सूर प्रस्थापित करण्याचे मोठे शिवधनुष्य या नवोदितांना पेलावे लागणार आहे. या कसोटीवर ते पूर्णपणे उतरणार का? याकडे संगीतप्रेमींचे लक्ष लागले आहे. अनेक वर्षांपासून पेठेच्या संस्कृतीमध्ये रूळलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव यंदाच्या वर्षीपासून मुकुंदनगर मधील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुलच्या जागेत स्थलांतरित झाला आहे. देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला उद्या ( बुधवार) पासून दिमाखात सुरूवात होत आहे.या पेठेबाहेरच्या पुण्यात पुन्हा नव्याने महोत्सव स्थिरस्थावर करणे हेच आता आयोजकांपुढचे मोठे आव्हान आहे. महोत्सवाच्या स्थापनेपासूनच भारतीय अभिजात संगीत विश्वातील दिग्गज कलावंतांना या स्वरमंचावर ऐकण्याची रसिकांना सवय झाली आहे. दरवर्षी एक वर्षाआड महोत्सवामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया, मेवाती घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. जसराज, पं. शिवकुमार शर्मा, ज्येष्ठ व्हायोलिनवादक एन.राजम यांसारख्या महाराष्ट्राबाहेरील विविध कलावंतांची महोत्सवात हमखास वर्णी लावली जाते. पण यंदा यातील एकही कलाकार महोत्सवात दिसणार  नाही. आयोजकांनी पं. बिरजू महाराज, उस्ताद शाहीद परवेज,पं. उल्हास कशाळकर, बेगम परवीन सुलताना अशा  काही मान्यवर कलावंताना सोडले तर यंदा 13 नवोदित कलाकारांना महोत्सवात संधी दिली आहे. गतवर्षी महोत्सवात 9 नवोदित कलाकार होते. यंदा ही संख्या वाढविण्यात आली आहे. त्यामुळे  नव्या जागेत महोत्सव स्थिरस्थावर करण्याची भिस्त याच नवोदितांवर आहे. सवाईमध्ये आपली कला सादर करण्याची प्रत्येक नवोदित कलाकाराचे स्वप्न असते. यंदाच्या वर्षी नवोदितांसाठी ही कसोटी ठरणार आहे. मात्र ज्येष्ठ रसिकमंडळींनी महोत्सवात नवोदितांपेक्षाही दिग्गज कलावंतांच्या सादरीकरणाला काहीसे झुकत माप दिले आहे.-----------------------------------------------------------भविष्यात हा महोत्सव नवोदित कलाकारांमुळे ओळखला जाण्याची शक्यता आहे. ज्यात गैर काहीच नाही. पण याच  आम्ही महोत्सवात पं. फिरोज दस्तूर, सरस्वतीबाई राणे, किशोरी आमोणकर, पं. भीमसेन जोशी यांच्यासह देशभरातीलअनेक मान्यवर गायकांच्या मैफली अनुभवल्या आहेत, त्याची आठवण आजही मनात आहे. या कलावंतांना समोर बसून ऐकण हा अनुभव काहीसा वेगळाच आहे. त्यामुळे महोत्सवात नवोदितांबरोबर दिग्गज कलावंतांचे अविष्कारही अधिकाधिक अनुभवायला मिळावेत अशी अपेक्षा ज्येष्ठ रसिकमंडळींनी व्यक्त केली आहे.------------------------------------------------------------यंदाच्या महोत्सवातील कलाकार पाहिले तर नवोदित कलाकार अधिक आहेत. जी चांगली गोष्ट आहे. नवोदितांना देखील व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवे. कारण शेवटी तेच हा सांगीतिक वारसा पुढे नेणार आहेत. मात्र आमच्यासारख्या कलावंतांना अजूनही ‘जुनं तेच सोन’ वाटत असल्याने ज्येष्ठ कलावंतांचे अविष्कार अनुभवणे ही आमच्यासाठी सुखद पर्वणी असते- वासुदेव कुलकर्णी------------------------------------------------------------इतर महोत्सवाची तिकिट ही आमच्यासारख्या लोकांना फारशी परवडणारी नसतात त्यामुळे सवाईमध्ये जुन्या-नव्या कलाकारांना ऐकण्याची पर्वणी मिळते. मी ठाण्यावरून दरवर्षी या महोत्सवाला हजेरी लावतो.  ज्येष्ठ  कलावंतांना ऐकायला मिळावे केवळ एवढीच त्यामागची इच्छा असते- नाना चरणकर.................महोत्सवातील आजचे कार्यक्रम ( दुपारी 3 ते रात्री 10)कल्याण अपार, औरंगाबाद ( सनई)रवींद्र परचुरे (गायन)वसंत काब्रा ( सतार)प्रसाद खापर्डे ( गायन) परवीन सुलताना (

टॅग्स :Puneपुणेmusicसंगीतartकला