प्रशांत ननवरे-बारामती : पुणे जिल्ह्यातील २०२०-२१ चा ऊस गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना पूर्ण होत आहे.गतवर्षी गळीत हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात आलेले कोरोनाचे संकट अद्याप देखील घोंघावत आहे. कोरोना संकटातच यंदाचा हंगाम सुरु झाला आहे. साखर कारखानदारीला यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे.अतिवृष्टीमुळे साखर कारखानदारी उशिरा सुरु झाली आहे.चांगल्या पर्जन्यमानामुळे ऊसपिकाची यंदा मुबलक उपलब्धता आहे.सर्वच कारखान्यांना कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप वेळेत उरकण्याचे तसेच कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना जाऊ नये यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे.
ऊस हे नगदी पिक मानले जाते.जिल्ह्यात बारामती,इंदापुर,दौंड,आंबेगाव,जुन्नर हे तालुके ऊसाचे आगार म्हणुन ओळखले जातात. या तालुक्यांमधुन शेतकरी सुरु,पुर्वहंगामी,आडसाली ऊसाचे उत्पादन घेतात.तर काही खोडव्याचे उत्पादन घेतात.यंदा ऊस गाळपात खासगी ,तर साखर उताऱ्यात सहकारी कारखाने आघाडीवर असल्याचे चित्र आहे. बारामती ऍग्रो साखर कारखान्याने आतापर्यंत तब्बल ३,९४,०३० मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. त्यांचा सरासरी साखर उतारा ८.५१% आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १,७७,०५० मे.टन ऊस गाळप करत सरासरी १०.१८% चा साखर उतारा राखत बाजी मारली आहे.
पुणे जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांचे आतापर्यंतचे एकुण ऊस गाळप २४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे.तर साखर उत्पादन २० लाख ३४ हजार ७३५ टन झाले आहे.कारखानानिहाय ऊस गाळप आणि साखर उतारा पुढीलप्रमाणे सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (१,७७,०५० मे.टन) (१०.१८%), माळेगाव सहकारी साखर कारखाना (१,७५,८००मे.टन) (१०.१०%), छत्रपती सहकारी साखर कारखाना (१,५१,१०० मे.टन ) (९.४६%), निरा भिमा सहकारी साखर कारखाना (१,७१६२२ मे.टन) (उपलब्ध नाही), घोडगंगा साखर कारखाना (१,३७,५१० मे.टन) (१०.६६%), संत तुकाराम साखर कारखाना (९७,६८० मे.टन) (९.२९%), भिमाशंकर सहकारी साखर कारखाना (९४००० मे.टन) (९.६३%), बारामती अ?ॅग्रो (३,१०,८५० मे.टन) (८.५१%), दौंड शुगर (२,१२,३०० मे.टन) (९.०२%), अनुराज शुगर्स लि. (१,२८३३० मे.टन) (९.५४%), श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना (१,७७,८८१मे.टन) (९.१८%), विघ्नहर सहकारी साखर कारखाना (१,८९८७०मे.टन)(९.६०%), कर्मयोगी सहकारी साखर कारखाना २ लाख ५४०० मे.टन,(९.६०% )———————————————
जिल्ह्यातील साखर कारखाने -१६ आतापर्यंत किती उसाचे गाळप (२४ लाख ३० हजार ६७० टन झाले आहे)—————————————अधिक गाळप करण्यासाठी सर्वच कारखाने प्रयत्नशील असतात.त्यामुळे जिल्हा कार्यक्षेत्राबाहेर जावुन ऊसाची पळवापळवी होते.पुणे जिल्ह्यातुन अहमदनगर,सोलापुर,सातारा जिल्ह्यात ऊस गाळपासाठी जातो.—————————————
ऊस उत्पादक शेतकऱ्याची प्रतिक्रिया —
यंदा उसाचे मुबलक उत्पादन आहे .त्यामुळे उसाची तोड वेळेवर होत नाही .इंदापुर तालुक्यात सहकारी साखर कारखान्यापेक्षा खाजगी कारखान्याकडे जास्त उसाचा पुरवठा होत आहे .दराच्या तुलनेतही खाजगी कारखाने जादा दर देतात. मात्र ,खाजगी कारखाने क्रमवारीने तोड न करता पंसतीनुसार वशीलबाजीने तोडणी करतात .उसाला अतिवृष्टी नुकसानभरपाईही मिळाली नाही.
रणजित खारतोडे, कळस