शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

कान्हेवाडीतर्फे चाकणला जपानी विद्यार्थ्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:09 PM

प्रिन्सिपल यामादा आकिनोरी यांनी गावातील रस्ते, आरओ प्लांट, पाणीपुरवठा व्यवस्था, बंदिस्त गटर व घरे ग्रामीण भागात चांगली असल्याने त्यांना कान्हेवाडीत राहण्यास आनंद होईल व भारतात परत आल्यास कान्हेवाडी गावास पुन्हा भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला.

चाकण : जपान येथील टोकियो शहरातील युकोबुनकान ग्लोबल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आदर्शगाव कान्हेवाडीतर्फे चाकण गावाला भेट दिली. गावातील विविध विकास योजना व ग्रामीण जीवन याची जवळून पाहणी केली. भारतातील ग्रामीण खेड्यातील विकास व ग्रामीण जीवन याचा अभ्यास त्यांनी केला.

प्रिन्सिपल यामादा आकिनोरी यांनी गावातील रस्ते, आरओ प्लांट, पाणीपुरवठा व्यवस्था, बंदिस्त गटर व घरे ग्रामीण भागात चांगली असल्याने त्यांना कान्हेवाडीत राहण्यास आनंद होईल व भारतात परत आल्यास कान्हेवाडी गावास पुन्हा भेट देण्याचा मनोदय व्यक्त केला. तानाका युता यांनी गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्था, ओला-सुका कचरा वर्गीकरण, घनकचरा व्यवस्थापनचे कामाबाबत समाधान व्यक्त केले. गावातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्याकामी केलेल्या प्रयत्नाबद्दल ग्रामपंचायतीची प्रशंसा केली. इबिकी युवामतो या विद्यार्थिनीने जि.प. शाळेतील वर्गखोल्या, शैक्षणिक साहित्य, बोलकी अंगणवाडी, बाग-बगीचा पाहून कान्हेवाडी येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असणार आहे असा विश्वास व्यक्त केला. यावेळी दुभाषक म्हणून श्रुती देशपांडे यांनी परदेशी पाहुण्यांना माहिती दिली. ग्रामपंचायती माहिती ग्रामविकास अधिकारी अरुण हुलगे यांनी दिली. ग्रामपंचायतच्या वतीने तुळशीचे रोप देऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत सरपंच शांता येवले यांनी केले. गावात केलेली विविध विकास कामे देश व राज्यपातळीवरील अभियान राबविणेबाबत ग्रामस्थांचे लाभलेले सहकार्य व सोडविलेल्या अडी-अडचणीबाबत माहिती आदर्श सरपंच भाऊसाहेब पवार यांनी दिली. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राहुल येवले, ग्रा.पं. सदस्य विनोद येवले, कुंदा पवार, मीरा येवले, कल्पना कडलक, शिक्षक दादासाहेब खरात, शीतल म्हेत्रे, भाग्यश्री येवले, महादू येवले तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. विनोद येवले यांनी आभार मानले.मिनामी ओगूची या विद्यार्थिनीने गाव, नदीघाट, स्मशानभूमी परिसर, शेतातील विविध पिके- ऊस, भात, फुलशेती-ग्लॅडीओ, गुलछडी, अस्टर, जरबेरा इत्यादी पाहून ग्रामीण भागातील शेती व शेतकरी यांची माहिती घेतली.

टॅग्स :JapanजपानPuneपुणे