पुणे : पुण्यात औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी मलिक यांनी शरद पवार यांचे भरभरून कौतुक करण्याबरोबरोच भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ''शरद पवार हे असे चाणक्य आहेत, जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांच्यावर मात केली असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''
''शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील अस कुणीही स्वप्नात पहिले नव्हते. तशीच परिस्थिती देशात आहे. बरेच लोक एकत्र येतील अशी कधी चर्चा होत नाही. या सर्वांची मोट बांधण्याचे काम पवार करतील. सर्वांना एकत्र आणायचा आहे त्या दृष्टीने पवार काम करत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
''देशात प्रश्न निर्माण झाल्यानंतर ज्याप्रमाणे युपीएच्या बैठका होणे आवश्यक आहे त्या होत नाहीत. त्यामुळे ममता दीदी, सपा, टीआरएस, आरजेडीसह दक्षिणेतील पक्षांची मोट बांधून काँग्रेस सकट एक मोर्चा तयार करायचा आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करून हा मोर्चा काम करेल. संपूर्ण देशात सध्या भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे देशभरातील भाजपविरोधकांची मोट बांधण्याचं काम शरद पवार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत.''
आता देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार
''देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या पक्षाकडे बघावं, एनडीए मध्ये कोणीही शिल्लक राहत नाही, एनडीए सोडून लोक जात आहेत. आजच्या घडीला भाजप विरोधात देशात वातावरण निर्माण झाला आहे. देशातल्या सर्व विरोधकांची मोट बांधण्याचे काम पवारांनी घेतला आहे. ममतादीदीसोबत त्याच विषयावर चर्चा झाली आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र घेऊन मोठी आघाडी निर्माण करून देशाच्या जनतेला पर्याय उपलब्ध करून देणार आहोत. त्याची चिंता भाजपला सतावत आहे.''