पुणे : पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, विदर्भासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात १ ते २ अंश घट नोंदविण्यात आली. विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पाठोपाठ मालेगावला ४०.८, अहमदनगरला ४०.६ अंश सेल्सिअस तापमान होते. पुणे आणि लोहगावला ३८.७ अंश सेल्सिअस तापमान होते. जळगाव ४१.२, कोल्हापूर ३६.९, महाबळेश्वर ३३.१, नाशिक ३८.१, सांगली ३८, सातारा ३७.६ आणि सोलापूरचे ३९.५ अंश सेल्सिअस तापमान होते. मराठवाड्यात औरंगाबाद येथे ३८, परभणी ४०.३ आणि नांदेडमध्ये ४०.५ अंश सेल्सिअस तापमान होते. विदर्भातील अमरावतीत ४०, बुलडाणा ३९, ब्रम्हपुरी ४०.३, चंद्रपूर ४१,गोंदिया ३८.२, नागपूर ३८.५, वाशिम ३९, वर्धा ३९.९ आणि यवतमाळला ३९.५ अंश तापमान नोंदविण्यात आले.
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:44 AM