पुणे : शहरात पहाटे पडलेल्या पावसाने आज दिवसभर उकाडा काहीसा कमी जाणवत होता़ या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला़ आकाश अंशत: ढगाळ राहून दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़ गेले दोन - तीन दिवस पाऱ्याने चाळीशी ओलांडल्याने पुणेकर घामाघूम झाले होते़ काल मध्यरात्रीच्या सुमारास पावसाची हलकी सर येऊन गेली़ आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत वेधशाळेत ०़६ मिमी पावसाची नोंद झाली होती़ या पावसाने कमाल तापमान ४०़५ अंश सेल्सिअसवरुन ते दिवसभरात ३८़८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने घामाच्या धारांनी त्रासलेल्या पुणेकरांना आज काहीसा दिलासा मिळाला़ ---------दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे़ पुढील काही दिवसांत कमाल तापमान ३९-४० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे़ त्याचवेळी किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, ते २२ ते २४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे़ त्यामुळे पुणेकर रात्री उकाड्याने हैराण होण्याची शक्यता आहे़
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
By admin | Published: May 11, 2015 6:30 AM