पुणे : दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने येत्या बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे़ राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला येथे ३९़५ अंश सेल्सिअस तर, सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे १५़३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ गेल्या महिन्यात ११ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड परिसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली होती़ त्यानंतर आता पुन्हा अरबी समुद्राकडून येणारे वारे आणि उत्तरेकडून येणाऱ्या या वाऱ्यांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश या भागात बुधवारी ७ मार्चला मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३५.७, जळगाव ३८.५, कोल्हापूर ३५.६,महाबळेश्वर ३१.५, मालेगाव ३७.४, नाशिक ३५.३, सांगली ३६.६, सातारा ३६.१, सोलापूर ३८.१, मुंबई ३१.२, सातांक्रुझ ३४.८, अलिबाग ३१.२, रत्नागिरी ३२. २, पणजी ३२.८, डहाणु ३०.५, भिरा ४०.५, उस्मानाबाद ३५.४, औरंगाबाद ३६, परभणी ३८.४, नांदेड ३८., अकोला ३८.६, अमरावती ३७.६, बुलढाणा ३५.२, ब्रम्हपुरी ३८.९, चंद्रपूर ३८.२, गोंदिया ३७.२, नागपूर ३७.५, वाशीम ३७.६, वर्धा ३७.६, यवतमाळ ३७.५
उत्तर-मध्य महाराष्ट्र,विदर्भात बुधवारी गारपिटीची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 9:45 PM
दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने येत्या बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
ठळक मुद्देबुधवारी ७ मार्चला मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़