भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायलाही सरकारने जाऊ दिलं नाही, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. संविधानिक मूल्यांची पायमल्ली आहे, असं आझाद यांना भीमा कोरेगावला जाऊ देण्यापासून सरकार अटकाव करतंय. त्यांच्या सभांना परवानगी नकारतंय. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी सुरू झाली आहे काय? असा माझा सवाल आहे. महाराष्ट्राच्या परंपरेला हे शोभणारं नाही. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे मोकाट बाहेर फिरताहेत मात्र संविधानाला मानणारे सभा घेऊ शकत नाहीत. त्यांना अटकाव केला जातो. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होते आहे. सरकारने भीमा कोरेगावला जाण्यापासून कोणालाही अटकाव करू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या परंपरेला कुणी खंडित करू नये. अन्यथा लोकक्षोभाला तोंड द्यावं लागेल.
आझाद यांना भीमा-कोरेगावला जाऊ न देणं म्हणजे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली- कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 4:20 PM