कान्हूरमेसाई येथील ग्रामपंचायत सरपंचपदासाठी चंद्रभागा विठ्ठल खर्डे यांचा एकमेव अर्ज आला होता. तर, उपसरपंच पदासाठी संदीप फक्कड राव तांबे व शर्मिला दत्तात्रय तळोले हे दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. शर्मिला दत्तात्रय तळोले यांनी उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने एकमेव अर्ज राहिल्याने संदीप फक्कड तांबे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कृष्णराज राजे व ग्रामसेवक के. बी. घासले यांनी काम पाहिले.
कान्हूरमेसाई ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्य म्हणून विजय घोलप, दीपक पुंडे, योगेश पुंडे, सोपान पुंडे, शर्मिला तळोले. आशिया तांबोळी. संगीता पुंडे राजश्री रुपनेर. हे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
या वेळी उपस्थित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्यांचा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांच्या हस्ते सत्कार मेसाई मंदिरात करण्यात आला. यावेळी माजी सरपंच नलिनी खर्डे, माजी सरपंच दादा खर्डे, मंत्रालय कक्षाधिकारी अजय खर्डे, माजी सरपंच अनिल गोरडे, विठ्ठलराव खर्डे, माजी सरपंच बंडू पुंडे, माजी उपसरपंच दीपक तळोले, कल्पेश खर्डे, पाटील कमलेश शिर्के. सुधीर पुंडे आल्ताफ तांबोळी. शिवाजी ननवरे, पोपट ननवरे , रतन तळोले. काळुराम रुपनेर भाऊसाहेब तळोले, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. या वेळी श्री मेसाईदेवीचे दर्शन घेऊन नूतन सरपंच खर्डे व तांबे यांची गुलालाने उधळण करत जल्लोष केला.
कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासकामांसाठी सहकार्य करणार असल्याचे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार व कान्हूरमेसाई येथील माजी सरपंच नलिनीताई खर्डे यांनी सांगितले.
फोटोओळ..... कान्हूरमेसाई. ता. शिरूर येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचा सत्कार करताना ग्रामस्थ.