शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अजितदादांनी सुचवलेल्या विकासकामांना चंद्रकांतदादांनी लावली कात्री

By नितीन चौधरी | Published: November 03, 2022 6:31 PM

पुणे जिल्ह्यातील ३०३ कोटींच्या विकासकामांना पालकमंत्र्यांची मंजुरी

पुणे : बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत जिल्हा नियोजन समितीच्या कामांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मान्यता दिली. यात अपेक्षेप्रमाणे माजी पालकमंत्री अजित पवार यांनी सुचविलेल्या कामांना कात्री लावण्यात आली आहे. “एखाद्या नेत्याने त्यांच्या काळातील आमदाराला थोडा निधी देऊन आपल्याकडे मोठा निधी ठेवला असेल तर तो निधी कमी करण्यात येईल. त्यांनी त्यांच्या आमदारांना न्याय दिला नाही, तो आता दिला आहे. बारामतीच्या निधीला देखील अजित पवार रागावतील इतकी कात्री लावलेली नाही. ते अस्वस्थ होती, रागावतील नाराजी व्यक्त करतील इतकी कात्री निश्चितच लावलेली नाही,” असे पाटील यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यामुळे आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील विरुद्ध अजित पवार असा वाद रंगण्याची शक्यता आहे.

पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते.राज्यात सरकार बदल झाल्यानंतर पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्वच कामांना स्थगिती दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच विकासकामे रखडली होती. शिंदे-फडणवीस सरकार येऊन अनेक महिने झाले तरी या कामांना मंजुरी देण्यात आली नव्हती. मात्र, दिवाळीपूर्वी पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेत या कामांचा आढावा घेऊन योग्य ती कामे मंजूर करू. विरोधक आमदारांना न दुखवता सत्ताधारी आमदार व पदाधिकाऱ्यांच्या कामांचाही त्यात अंतर्भाव करण्यात येईल असे स्पष्ट केले होते. त्याच वेळी विरोधकांच्या कामांना कात्री लागणार हे स्पष्ट झाले होते. त्यातही चंद्रकांत पाटील व अजित पवार यांच्यातील ‘सख्य’ पाहती पवार यांनी सुचविलेल्या कामांबाबत पाटील काय निर्णय घेतात याची उत्सुकता होती. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत पाटील यांनी अजित पवार यांना एकप्रकारे शह दिला आहे.

पाटील म्हणाले, “या कामांना जशीच्या तशी मान्यता न देता ती तपासण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार वार्षिक आराखड्यात समाविष्ट प्रत्येक कामांची माहिती घेतली. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या ३०३ कोटींच्या कामांना यावेळी मंजुरी देण्यात आली. येत्या ५ किंवा ६ तारखेला त्याचे एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या विकासकामांना जी खीळ बसली होती, ती आता उठली आहे. हा पहिला टप्पा आहे. ६ तारखेला आणखी २०० कोटींच्या कामांना मान्यता दिली जाणार आहे. आता लवकर मान्यता द्यावी लागणार आहे. तरत ३१ मार्चच्या आत कामे पूर्ण होतील. यात सुमारे ४३०० प्रकारची कामे आहेत. त्यात रस्ते स्मशानभुमी, शाळा इमारती, शहरांमधील दलित वस्ती, आदिवासी भागांतील रस्ते आहेत.”

विरोधकांच्या कामांची तपासून घेऊ ती रद्द करताना राजकारण करणार नाहीत, असे पाटील यांनी पूर्वीच्या बैठकीवेळी स्पष्ट केले होते. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “मान्यता दिलेल्या कामांची यादी पाहिल्यावर विरोधक आमदारांनाही आनंदाचा धक्का बसेल अशी मान्यता दिली आहे. या त कोणतेही राजकारण केले नसून विकासाचे राजकारण केलेले नाही. सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनीही जिल्ह्यातील विकासमकामे सुचविली होती. नव्या सरकारमधील शिवसेना भाजपच्या नेत्यांनी कामे पडताळून ती जोडण्यात आली आहेत. नव्याने सुचविलेल्या गावांच्या विकासकामांनाही मान्यता देण्यासाठी निधी शिल्लक असतो त्याचा वापर करण्यात आला आहे. यातून दोन्हीकडील नेत्यांचे समाधान होणारआहे.” ही सर्व विकासकामे नियोनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात यावेत आणि कामांचा दर्जा चांगला राहील याकडेही विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारPoliticsराजकारणBJPभाजपा